फुटबॉल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुटबॉल
फुटबॉल

फुटबॉल

sakal_logo
By

पोद्दार, पाटणकर, छत्रपती शाहू एसएससी पुढील फेरीत
महापालिकास्तर फुटबॉल; गुरूदेव, सेंट झेवियर्स, एस्तर, गोएंका, स. म.ही पुढे
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ : महापालिकास्तर शालेय फुटबॉल स्पर्धेत चौदा वर्षाखालील मुलांत पोद्दार इंटरनॅशनल स्कूलसह नागोजीराव पाटणकर, छत्रपती शाहू एसएससी, गुरूदेव विद्यानिकेतन, सेंट झेवियर्स, एस्तर पॅटर्न, विमला गोएंका व स. म. लोहिया हायस्कूलने पुढील फेरीत आज प्रवेश केला. छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे सामने झाले.
चौदा वर्षांखालील मुलांत पोद्दार इंटरनॅशनलने न्यू हायस्कूलला ३-०ने हरविले. त्यांच्या हसनेन अन्सारीने दोन, तर आयुष्य निकमने एक गोल केला. त्यानंतरच्या सामन्यातही पोद्दारने शिवाजी मराठा हायस्कूलचा ५-० ने पराभव केला. त्यांच्या आयुष्यने तीन, तर शंतनूने दोन गोल केले. छत्रपती शाहू एसएससी विद्यालयाने प्रबुद्ध भारत हायस्कूलला २-० ने हरविले. त्यांच्या आदिल अनुसे व पृथ्वीराज चव्हाणने प्रत्येकी एक गोल नोंदवला. गुरुदेव विद्यानिकेतनने राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलला १-० ने हरविले. त्यांच्या प्रज्ज्वल कांबळेने गोल केला.
सेंट झेवियर्स हायस्कूलने भाई माधवराव बागल हायस्कूलवर २-०, एस्तर पॅटर्न हायस्कूलने छत्रपती शाहू सीबीएससीला १-०, तर नागोजीराव पाटणकर हायस्कूलने देशभूषण हायस्कूलवर सडनडेथवर १-०ने मात केली. विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूलने वसंतराव देशमुख इंग्लिश मीडियम स्कूलला १-०, तर स. म. लोहिया हायस्कूलने नेहरू हायस्कूलला २-०ने पराभूत केले.
सतरा वर्षाखालील मुलांत छत्रपती शाहू एसएससी विद्यालयाने इंदिरा गांधी विद्यालयाला २-०, तर वसंतराव चौगुले हायस्कूलला ३-०ने हरविले. स. म. लोहिया हायस्कूलने
सेंट झेवियर्स हायस्कूलला १-०ने पराभूत केले. महाराष्ट्र हायस्कूलने राधाबाई शिंदे स्टेटवर ३-०, तर प्रायव्हेट हायस्कूलवरही ३-०ने मात केली. प्रिन्स शिवाजी इंग्लिश स्कूलने राधाबाई शिदे ग्लोबल व माईसाहेब बावडेकर ॲकॅडमीवर प्रत्येकी ३-०ने बाजी मारली.