Wed, Feb 8, 2023

पोलीस असल्याची बतावणी करून अंगठी लंपास
पोलीस असल्याची बतावणी करून अंगठी लंपास
Published on : 1 December 2022, 6:28 am
पोलिस असल्याची बतावणी करून अंगठी पळविली
कोल्हापूर : पोलिस असल्याची बतावणी करून एका ज्येष्ठ नागरिकाची सोन्याची अंगठी पळविल्याचा करण्याचा प्रकार आज दुपारी घडला. याबाबत रात्री जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंद झाली. प्रभाकर यशवंतराव जाधव (वय 83, रा. वाय. पी. पोवार नगर) असे फिर्यादीचे नाव आहे.
दुपारी अडीचच्या सुमारास बाजारातून साहित्य खरेदी करून जात असताना गोखले कॉलेज चौक परिसरात दोन अनोखी व्यक्तींनी थांबवले. पुढे चोरी झाली असून, तपासणी सुरू असल्याचे सांगून जबरदस्तीने हातातून सोन्याची अंगठी काढून घेतली आणि ती हात रुमालामध्ये घालून खिशात ठेवण्याचा बहाणा केला आणि ते पसार झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे.