
''अर्जुन''वीर स्वप्नीलचे स्वागत
66072
कोल्हापूरात ''अर्जुन''वीर
स्वप्नील पाटीलचे स्वागत
कोल्हापूर, ता. २ : अर्जुन पुरस्कार प्राप्त पॅरा जलतरण पट्टू स्वप्नील पाटीलचे करवीर नगरीत आगमन झाले. त्याचे जल्लोषी स्वागत व मिरवणूक काढण्यात आली. स्वप्नीलच्या स्वागतासाठी शहाजी महाविद्यालय, छत्रपती राजाराम जलतरण तलाव ग्रुप, कोल्हापूर जिल्हा पॅरालिम्पिक असोसिएशनतर्फे दसरा चौकात नियोजन केले होते. माजी नगरसेवक सत्यजित कदम, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, प्राचार्य आर. के. शानेदिवाण, संघटनेचे अनिल पवार, वडील संजय पाटील, प्रशांत मोटे, बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे प्रशांत पाटील यांच्या हस्ते स्वप्नीलचे स्वागत करण्यात आले. यानंतर दसरा चौक, बिंदू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत मिरवणूक काढण्यात आली. स्वप्नील याचे खासदार धनंजय महाडिक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते बिभीषण पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पॅरा जलतरण स्पर्धेत कोल्हापूर शहर आणि देशाचं नाव उंचावण्याचे काम आंतरराष्ट्रीय जलतरणपटू स्वप्नील याने केलंय. त्याचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारान सन्मान होणं हे कोल्हापूरसाठी अभिमानास्पद असल्याच खासदार महाडिक यांनी सांगितले.