
पवार, चेचर कडे जिल्हा संघाचे नेतृत्व
10999, 11000
पवार, चेचर यांच्याकडे
जिल्हा कबड्डी संघाचे नेतृत्व
कोल्हापूर ता. १ : परभणी येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कुमार गट मुले व मुली कबड्डी स्पर्धेसाठ जिल्हा कबड्डी संघ जाहीर झाला. यामध्ये मुलांच्या संघाच्या कर्णधारपदी आदित्य पवार याची तर मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी अंकिता चेचर हिची निवड करण्यात आली. दहा दिवस झालेल्या सराव शिबिरातून जिल्हा संघाची निवड करण्यात आली. कबड्डी संघटनेचे सचिव संभाजी पाटील यांनी संघाची घोषणा केली.
दरम्यान, अंकिता वडणगेतील जय किसान क्रीडा मंडळाची खेळाडू असून, मंडळाचे अध्यक्ष व माजी जि.प.सदस्य बी. एच. पाटील, प्रशिक्षक रवींद्र पाटील, रघुनाथ पाटील, जोतिराम खवरे, संदीप पाटील, दीपक जाधव, सागर नाईक, सागर देवणे यांचे मार्गदर्शन लाभले.
संघ असा- जिल्हा कुमार गट मुले आदित्य पवार (कर्णधार), ओमकार पाटील, दीपक पाटील, हर्षवर्धन चौगुले, धीरज पाटील, यतीराज पोलेकर, साहिल पाटील, शैलेंद्र गायकवाड, यश शिंदे, संकेत चव्हाण, अभय मलगुंडे, पवन मोहिते. संघ प्रशिक्षक पंडित पोवार, संघ व्यवस्थापक शहाजहान शेख. कोल्हापूर जिल्हा कुमारी गट मुली-
अंकिता चेचर (कर्णधार), निषा निकम, समीक्षा साळवी, बंदिनी पाटील, समीक्षा डोंगळे, प्रांजल पोवार, निर्जला बोले, अमृता जाधव, श्रध्दा कुंभार, प्राची डांगे, निकिता सुतार, संघ प्रशिक्षक के. एस. माने, संघव्यव्यापक प्रा. संदीप लव्हटे.