
माई ह्युंडाई ठरले बेस्ट कस्टमर सर्व्हिस
11004
कोल्हापूर : कस्टमर सर्व्हीस क्वालिटी इंडेक्समधील प्रथम पुरस्कारासह माई ह्युंडाई टीम.
माई ह्युंडाई ठरले बेस्ट कस्टमर सर्व्हिस
कोल्हापूर, ता. २ : येथील माई ह्युंडाईला ह्युंडाई मोटर्सकडून दिला जाणारा कस्टमर सर्व्हीस क्वालिटी इंडेक्स प्रकारात प्रथम पारितोषिक मिळाले. कर्जत येथील ह्युंडाई मोटर्सच्या कार्यक्रमात पश्चिम विभागातील ३० डीलर्समधून उत्कृष्ट सेवेसाठी माई ह्युंडाईला हा सन्मान प्राप्त झाला. ह्युंडाई मोटर्सचे झोनल पार्टस् अँड सर्व्हिस हेड के. नागेश यांच्या हस्ते माई ह्युंडाईचे असि. जनरल मॅनेजर (सर्व्हीस) महेश गेज्जी यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी शाहबाज नायकवडी, मुदसर चिंचली, अमोल चौगुले, अजित मंगावते उपस्थित होते. माई ह्युंडाईने ग्राहकांच्या पाठबळावर रौप्यमहोत्सवी वर्षात प्रवेश केला आहे. ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देत असल्यामुळे माई ह्युंडाईला नेहमी पुरस्कार मिळत आहेत. हे पुरस्कार जबाबदारी वाढवतात आणि आणखी चांगलं काम करायला प्रवृत्त करतात, असे प्रतिपादन मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांनी केले.