त्या चिमुकल्यांना हवी आहे माणुसकीची ऊब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

त्या चिमुकल्यांना हवी आहे माणुसकीची ऊब
त्या चिमुकल्यांना हवी आहे माणुसकीची ऊब

त्या चिमुकल्यांना हवी आहे माणुसकीची ऊब

sakal_logo
By

‘त्या’ चिमुकल्यांना
हवी आहे
माणुसकीची ऊब

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : कुडकुडणाऱ्या थंडीत पहाटे त्यांचे आई-वडील ऊस तोडणीसाठी जातात. पत्रे उभा करून केलेल्या शेडमध्ये ही मुले थंडीने पार गारठतात. अशी तब्बल अकराशे मुले जिल्ह्यातील ऊस तोडणी आणि वीट भट्टी कामगारांसोबत आहेत. या मुलांसाठी अवनि संस्थेने यंदा माणुसकीची ऊब देण्यासोबतच उबदार कपड्यांकरिता आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत अनेकजण जुने स्वेटर, मफलर आणि ब्लॅंकेट अशी उबदार कपडे जमा करत आहेत.
अवनि संस्थेतर्फे दरवर्षी २७ ठिकाणी वीटभट्टी व साखर शाळा ३ ते ६ वयोगटांतील बालकांसाठी डे-केअर सेंटर चालविले जाते. या वर्षीही संस्थेने जिल्‍ह्यातील ५ साखर कारखाना कार्यस्थळावरील ऊसतोड कामगारांच्या बालकांसाठी डे केअर सेंटर सुरू आहेत. तसेच वीटभट्टी कार्यस्थळावर २४ ठिकाणी डे केअर सेंटर सुरू केले आहेत. यामध्ये ३ ते ६ या वयोगटांतील ७७५ तसेच ६ ते १४ वयोगटांतील ७२५ बालकांना शाळेच्या प्रक्रियेत आणण्याचे काम करत आहेत.
दसरा चौक, अवनिचे परीख पूल जवळील कार्यालय आणि जिवबा नाना येथील संस्थेत ऊबदार कपडे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हा उपक्रम पाच डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
या उपक्रमातून संकलित झालेली ऊबदार कपडे कसबा बावडा येथील राजाराम कारखाना, इचलकरंजी येथील पंचगंगा कारखाना, कुडित्रे येथील कुंभी कारखाना तसेच वाकरे, खुपिरे, दोनवडे, सरनोबतवाडी, उचगाव आणि जाधववाडी येथील वीटभट्टी कामगारांच्या मुलांना देण्यात येणार आहेत. यासाठी प्रकल्प अधिकारी साताप्पा मोहिते, इम्रान शेख अमर कांबळे, रवी कुराडे, अनिकेत कदम व अक्षय पाटील परिश्रम घेत आहेत.

कोट
दीड महिन्यापासून ऊस तोडणी कामगार जिल्ह्यात दाखल झाले आहेत. थंडी पडण्यास सुरूवात झाली आहे. या वेळी मुलांना मायेची ऊब हवी आहे. स्वच्छ धुतलेली, वाळवलेली ऊबदार कपडे आमच्याकडे जमा करावीत.
- सात्तापा मोहिते, कल्प अधिकारी, अवनि