अपंग पुनर्वसन संस्थेतर्फे दिव्यांगांचा सत्कार सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपंग पुनर्वसन संस्थेतर्फे
दिव्यांगांचा सत्कार सोहळा
अपंग पुनर्वसन संस्थेतर्फे दिव्यांगांचा सत्कार सोहळा

अपंग पुनर्वसन संस्थेतर्फे दिव्यांगांचा सत्कार सोहळा

sakal_logo
By

11021
कोल्हापूर : अपंग पुनर्वसन संस्थेतर्फे दिव्यांग बांधवांचा सत्कार करताना वसंतराव मुळीक. या प्रसंगी उपस्थित मान्यवर.

अपंग पुनर्वसन संस्थेतर्फे
दिव्यांगांचा सत्कार सोहळा
कोल्हापूर, ता. ३ : अपंग पुनर्वसन संस्थेतर्फे ६१ व्या जागतिक अपंग दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील यश मिळविलेल्या दिव्यांगांचा सत्कार करण्यात आला.
अंध गायक सिद्धराज पाटील, तबला वादक रोहन लाखे, दिव्यांग लघु चित्रपट दिग्दर्शक निखिल कुंडले व अर्जुन पुरस्कारप्राप्त जलतरणपटू स्वप्नील पाटील, शुक्ला बिडकर, सोनम पाटील, सुमित कुरणे, आदित्य पाटील यांचा सत्कार झाला. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या हस्ते सत्कार झाला. दिव्यांग कार्यकर्त्या मंजूषा आडके, दिव्यांग राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक किरण बावडेकर, क्रीडा अंध शिक्षक अजय वनकुद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र पायमल यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सेक्रेटरी बापूराव चौगुले यांनी आभार मानले. कार्यक्रमास संस्थेचे विश्‍वस्त दत्तात्रय मामुलकर, उमा पवार, विलास मोरस्कर, सुधाकर पाटील, संजय पाटील, विनोद कोरवी, राजू परिते, अनिता काकडे उपस्थित होते.