
ए एस ट्रेडर्स बारा लाखाची फसवणूक
ए. एस. ट्रेडर्सविरोधात
आणखी तीन तक्रारी
कोल्हापूर : ए. एस. ट्रेडर्स कंपनीच्या विरोधात तक्रारींमध्ये आज पुणे आणि सोलापूर येथील तीन तक्रारदारांची भर पडली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या गुंतवणूकदारांनी १२ लाख रुपये ए. एस. ट्रेडर्समध्ये गुंतविल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले, की भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून ए. एस. ट्रेडर्स कंपनीने १६९ गुंतवणूकदारांची चार कोटी ८९ लाख ७२ हजार ६४९ रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी कंपनीसह २७ संचालक आणि एजंटवर गुन्हे दाखल झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील दोन आणि सोलापूर जिल्ह्यातील एका गुंतवणूकदाराने ए. एस. ट्रेडर्समध्ये गेल्या वर्षभरात केलेल्या गुंतवणुकीत १२ लाखांची फसवणूक झाल्याचा उल्लेख तक्रारदारांनी तक्रारीत केला आहे. त्यानुसार तक्रारदारांचे जबाब नोंदवून घेण्यात आले.
---