सौंदत्ती गाड्या रवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सौंदत्ती गाड्या रवाना
सौंदत्ती गाड्या रवाना

सौंदत्ती गाड्या रवाना

sakal_logo
By

66535

रेणुकाभक्त सौंदत्तीकडे रवाना
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : ‘उदं गं आई उदं,’ या जयघोषात सौंदत्तीला शहर परिसरातील रेणुकाभक्त आज रवाना झाले. राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर मध्यवर्ती स्थानकाच्या १३२ गाड्यांचा त्यात समावेश आहे. यात्रेसाठी एकूण १४७ गाड्यांचे बुकिंग झाले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्तीतील रेणुका देवीची यात्रा ४ ते ७ डिसेंबर दरम्यान होत आहे. यात्रेसाठी जिल्ह्यातील भक्त दरवर्षी रवाना होतात. कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना व करवीर निवासिनी रेणुकाभक्त सेवा संघटनेने यात्रेची जय्यत तयारी केली आहे. यंदाही यात्रेसाठी भक्तांनी गाड्यांचे बुकिंग केले होते. दोन दिवसांपूर्वी एक, तर काल (शनिवार) बारा गाड्या यात्रेसाठी रवाना झाल्या. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, उत्तरेश्‍वर पेठेसह उपनगरातील भक्त पहाटे रवाना झाले. काही गाड्या सायंकाळी रवाना झाल्या.
दरम्यान, ‘गोकुळ’ने यात्रा काळात सौंदत्तीवर जाणाऱ्या भक्तांसाठी दूध व दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून दिले आहेत. आज सकाळी ओढ्यावरील रेणुका मंदिरातून ते सौंदत्तीकडे पाठविले. त्याचे पूजन मंदिरातील पुजारी व गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी संचालक अरुण डोंगळे, अजित नरके, हणमंत पाटील, लक्ष्मण धनवडे, प्रशांत मंडलिक, करवीर निवासिनी रेणुका भक्त सेवा संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते.