Mon, Jan 30, 2023

सात दिवसात अतिक्रमण काढा
सात दिवसात अतिक्रमण काढा
Published on : 9 December 2022, 4:23 am
सात दिवसांत अतिक्रमण काढा
कोल्हापूर : ‘विशाळगडवर पावलोपावली अतिक्रमण झालेले आहे. गडावरील अतिक्रमण सात दिवसांत जर पाडले नाही तर १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे अभिषेक घालून अतिक्रमण हटाव मोहिमेची सुरुवात होईल. हजारो शिवसैनिक किल्ले विशाळगडकडे रवाना होऊन अतिक्रमणे उद्ध्वस्त करतील, अशा इशारा शिवसेना (ठाकरे) गटाच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आला. या वेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, रविकिरण इंगवले उपस्थित होते.