Fri, Feb 3, 2023

उद्या बैठक
उद्या बैठक
Published on : 11 December 2022, 5:01 am
मंत्रालयातील बैठकीस विश्व
हिंदू परिषद उपस्थित राहणार
कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमणासंदर्भात विश्व हिंदू परिषदेच्या पाठपुराव्याला यश आले असून, उद्या (ता. १२) मंत्रालयात बैठक होत आहे. परिषदेचे पदाधिकारी बैठकीस उपस्थित राहणार असल्याची माहिती कुंदन पाटील पत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात म्हटले आहे की, विश्व हिंदू परिषदेच्या निवेदनाप्रमाणे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १२ डिसेंबरच्या बैठकीस जिल्ह्यातून विश्व हिंदू परिषदेस उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे. मागील दोन दिवसांपासून विशाळगडाच्या पायथ्याशी असलेले अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे. वनमंत्री मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार अतिक्रमणे हटवली जात आहेत.