Sun, Jan 29, 2023

शिवाजी विद्यापीठ तलवारबाजी संघ जाहीर
शिवाजी विद्यापीठ तलवारबाजी संघ जाहीर
Published on : 16 December 2022, 1:42 am
विद्यापीठाचा तलवारबाजी संघ जाहीर
कोल्हापूर, ता. १६ : जम्मू येथे होणाऱ्या अखिल भारतीय आतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा पुरुष व महिलांचा संघ जाहीर झाला. संघामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे. स्पर्धा २० ते २३ डिसेंबर दरम्यान जम्मू विद्यापीठ जम्मू येथे होणार आहे.
मुलांच्या संघात आदित्य अनगळ, धनंजय जाधव, विपुल येडेकर, गिरीश जकाते, प्रथम कुमार शिंदे, प्रणव रावळ, श्रेयस तांबवेकर, अथर्व करणाळे, साहिल गुजर, श्रीधर पवार, ओम जवंजाळ ,तर मुलींच्या संघात ज्योती सुतार, अमृता तराळ, श्लोका शिंदे, अनन्या जोशी, अनुजा धबाले, सानिका कदम, स्नेहल पाटील, तन्वी कुराडे, श्रेया शिंदे. संघ व्यवस्थापक कॅप्टन डॉ. राहुल मगदूम, प्रशिक्षक प्रफुल धुमाळ.