Mon, Jan 30, 2023

एस ट्रेडर फसवणूक फॉलोप बातमी
एस ट्रेडर फसवणूक फॉलोप बातमी
Published on : 19 December 2022, 5:13 am
ट्रेडविंग्ज कार्यालयाची तपासणी
कोल्हापूर: जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या ए.एस. ट्रेडर्सच्या फसवणुकीची व्याप्ती आणखी वाढली आहे. या कंपनीशी संलग्न असणाऱ्या ट्रेडविंग्ज कंपनीच्या कार्यालयाची आज शाहूपुरी पोलिसांनी तपासणी केली. ए. एस. ट्रेडर्स कंपनीतील काही संचालकांनी ट्रेडविंग्ज ही कंपनी स्थापन केली होती. फसवणुकीतील व्यवहाराची रक्कम या कंपनीशीही संबंधित आहे का, याचा तपास पोलिस करत होते. यासाठी आज ट्रेडविंग्ज कंपनीच्या पितळी गणपती येथील कार्यालयाची पोलिसांनी तपासणी केली. यातून ही कंपनी ए. एस ट्रेडर्सशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, ए. एस. ट्रेडर्स कंपनीची पाच खाती गोठवल्याचे पोलिसांनी सांगितले.