वृत्तपत्र विक्रेता चषक चे अनावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृत्तपत्र विक्रेता चषक चे अनावरण
वृत्तपत्र विक्रेता चषक चे अनावरण

वृत्तपत्र विक्रेता चषक चे अनावरण

sakal_logo
By

11302
कोल्हापूर : वृत्तपत्र विक्रेता चषक अनावरणप्रसंगी मान्यवर.  
-----------


वृत्तपत्र विक्रेता चषकाचे अनावरण 
कोल्हापूर, ता. २३ : वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी प्रथमच एकदिवसीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. राजारामपुरी वृत्तपत्र विक्रेता संघटना व चाटे शिक्षण संस्था प्रायोजित ‘वृत्तपत्र विक्रेता चषक - २०२२’ स्पर्धा शास्त्रीनगर मैदानावर होईल. मंगळवारी (ता. २७) स्पर्धा होईल. स्पर्धेसाठी कोल्हापुरातील राजारामपुरी डेपो, संभाजीनगर डेपो व भाऊसिंगजी रोड वृत्तपत्र विक्रेता डेपो ( दोन टीम), कावळा नाका डेपो अशा पाच संघांनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेचा चषक अनावरण नुकतेच झाले.   
विजेत्याला आकर्षक चषक व रोख रक्कम बक्षीस आहे. स्पर्धेसाठी कोल्हापुरातील दैनिकांनी संघासाठी किट प्रायोजित केले आहे. स्पर्धा सकाळी ९ ते ६ या वेळेत होईल. चषक अनावरणप्रसंगी महाराष्ट्र राज्य संघटनेचे उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे, जिल्हाध्यक्ष किरण व्हनगुत्ते, शहराध्यक्ष रवी लाड, शहर संघटक शंकर चेचर, उपाध्यक्ष रणजित आयरेकर, संभाजीनगर डेपो अध्यक्ष राजाराम पाटील, उपाध्यक्ष नामदेव गोंधळी, कावळा नाका डेपो अध्यक्ष किशन शहापुरे, राजारामपुरी डेपो संघटक रमेश जाधव, अध्यक्ष असिफ मुल्लाणी, उपाध्यक्ष महेश घोडके, ग्रामीण उपाध्यक्ष संदीप ब्रम्हदंडे, सचिव रत्नाकर शिंदे, स्पर्धा समिती सदस्य सौरभ लाड, श्रीकांत सावेकर, करण सावेकर, संग्राम शिंदे, ऋतुराज चेचर, सुरेश ब्रम्हपुरे, तंजील अन्सारी, अमित शिंदे, प्रणव शिंदे उपस्थित होते.