जानेवारीत रंगणार आरपीएल''चा थरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जानेवारीत रंगणार आरपीएल''चा थरार
जानेवारीत रंगणार आरपीएल''चा थरार

जानेवारीत रंगणार आरपीएल''चा थरार

sakal_logo
By

70715
कोल्हापूर : ‘सकाळ माध्यम समूह’ व रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल आयोजित रोटरी प्रीमिअर लीग २०२३ च्या लोगो अनावरणप्रसंगी ‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक संचालक श्रीराम पवार, कार्यकारी संपादक निखिल पंडितराव, रोटरी सेंट्रल प्रेसिडेंट विजय यवलुजे, इव्हेंट चेअरमन सूर्यकांत पाटील-बुद्धिहाळकर, उपसरव्यवस्थापक (जाहिरात) आनंद शेळके.
 
‘आरपीएल’चा थरार रंगणार जानेवारीत
---
प्रकाशझोतात सामने; येत्या १२ पासून शास्त्रीनगर मैदानावर आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ : ‘सकाळ माध्यम समूह'' व रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल आयोजित रोटरी प्रीमिअर लीग ‘आरपीएल’चा नववा हंगाम १२ जानेवारीपासून सुरू होत आहे. शास्त्रीनगर मैदानावर १२ ते १५ जानेवारी २०२३ असे सलग चार दिवस प्रकाशझोतात सामने रंगणार असून, स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे.
स्पर्धेत आठ संघांत चुरशीने सामने रंगणार आहेत. रोटेरियनमधील मैत्रीपूर्ण संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने सलग नऊ वर्षे स्पर्धा होत आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलने क्रीडा क्षेत्रातही नेहमीच वेगळी ओळख निर्माण केली असून, ‘आरपीएल'' त्यातील एक महत्त्वाची स्पर्धा आहे. स्पर्धेत सहभागी होणारे संघ राज्यातील नामवंत उद्योग व्यवसायाशी जोडलेले असून, फ्रॅन्चायसीद्वारे संघ स्पर्धेसाठी सहभागी होतात. लिलाव पद्धतीने खेळाडूंची निवड होऊन उत्कृष्ट संघ बांधणीकडे विशेष लक्ष दिले जाते. यामुळे मैदानावर होणारे सामने अधिक रंगतदार आणि चुरशीचे ठरतात. साहजिकच, प्रत्येक संघ प्रत्येक सामना जिंकण्यासाठी जिगर पणाला लावतो. सीमारेषेबाहेरील मैत्री मैदानात मात्र प्रतिस्पर्धत्व निर्माण करते. पण, मैदानाबाहेर ही मैत्री पुन्हा फुलते, हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे.  
स्पर्धा टेनिस चेंडूवर असून, प्रत्येक सामना दहा षटकांचा असेल. विविधरंगी आतषबाजी स्पर्धेचे मुख्य आकर्षण असेल. स्पर्धा प्रेक्षकांसाठी खुली असणार आहे. स्पर्धेचे थेट प्रक्षेपण होईल. स्पर्धेत रत्नागिरी, धारवाड, पणजी, कोल्हापूर, सांगली, बेळगाव जिल्ह्यांतील खेळाडू सहभागी होणार आहेत.

दृष्टिक्षेपात स्पर्धा
- प्रत्येक सामना दहा षटकांचा
- प्रकाशझोतात स्पर्धा होणार
- टेनिस बॉलचा वापर
- सेलिब्रिटीजची उपस्थिती
- भव्य आतषबाजी
- खेळाडूंसाठी विविधरंगी किट
- विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल