भीमा - कोरेगाव नियोजन बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भीमा - कोरेगाव नियोजन बैठक
भीमा - कोरेगाव नियोजन बैठक

भीमा - कोरेगाव नियोजन बैठक

sakal_logo
By

भीमा - कोरेगाव नियोजन बैठक 

कोल्हापूर : १ जानेवारी हा दिवस भीमा कोरेगाव विजय स्तंभ शौर्य स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षीही कोल्हापूर जिल्हा बौद्ध- अवशेष व विचार संवर्धन समिती आणि समता सैनिक दल, तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व विविध संघटनांच्या वतीने बिंदू चौक येथे ३१ डिसेंबर रोजी अभिवादन कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती अध्यक्ष टी. एस. कांबळे, कार्याध्यक्ष बापूसाहेब कांबळे यांनी दिली. सकाळी ११ ते १ या वेळेत कोरेगाव भीमा लढाईमधील सहभागींचे वंशज सुभाष इनामदार यांच्या हस्ते बिंदू चौक येथे उभारलेल्या भीमा कोरेगाव स्मृतिस्तंभ प्रतिकृतीचे उद्‌घाटन होणार आहे. १ जानेवारी रोजी सकाळी ९ ते १ पर्यंत अभिवादनासाठी स्तंभ असणार आहे. यावेळी उपस्थितांना ‘भारतीय संविधान’, ‘भगवान बुद्ध व त्यांचा धर्म’ तसेच छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयीच्या ग्रंथांचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी सुखदेव बुध्याळकर, जे. एस. चावरे, श्वेता हुलस्वार, शुद्धोधन शांतिरतन यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.