पोलीस भरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलीस भरती
पोलीस भरती

पोलीस भरती

sakal_logo
By

पोलिस भरतीत बायोमेट्रिक
हजेरीचा प्रशासनाचा विचार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ : पोलिस भरती प्रक्रियेत बायोमेट्रिक हजेरी घेण्याचे नियोजन प्रशासनाच्या पातळीवर सुरू झाले आहे. शारीरिक चाचणीसाठी रोज सुमारे ८०० उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे. तीन जानेवारीपासून पोलिस मुख्यालयातही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज भरती प्रक्रियेबाबतची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये भरती प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर, कशा पद्धतीने घ्यावी, याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. २४ जागांसाठी ही भरती होणार आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया पोलिस मुख्यालयातच होणार आहे. तीन ते पाच जानेवारीपर्यंत रोज ८०० उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलवले जाणार आहे. उर्वरित दिवशी इतर सर्व उमेदवार असतील. उमेदवार तेच आहेत याची खातर जमा करण्यासाठी बायोमेट्रीक हजेरी घेण्याचा विचार आजच्या बैठकीत झाला. शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत उपस्थित होते.