टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे ७ पासून आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे
७ पासून आयोजन
टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे ७ पासून आयोजन

टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे ७ पासून आयोजन

sakal_logo
By

टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे
७ पासून आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : श्रीमंत छत्रपती मालोजीराजे प्रेमी व मॉर्निंग स्पोर्टस क्लबतर्फे ७ ते १५ जानेवारीदरम्यान टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. दुधाळी मैदानावर स्पर्धा होत असून, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा होत आहे, अशी माहिती अध्यक्ष श्रीधर गाडगीळ यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
गाडगीळ म्हणाले, ‘‘विजेत्यास ७५ हजार रुपये व पाच फूट उंच चषक, उपविजेत्यास ५१ हजार रुपये व चषक, तर उपांत्य फेरीत पराभूत संघांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्यात येणार आहेत. प्रत्येक सामन्यातील सामनावीरास टी-शर्ट दिला जाईल. १३ ते १५ जानेवारीपर्यंतचे सामने प्रकाशझोतात खेळविले जाणार आहेत.’’
युवराज संकपाळ म्हणाले, ‘‘यशराजे छत्रपती यांच्या हस्ते ७ जानेवारीला सकाळी दहाला स्पर्धेचे उद्‍घाटन होईल. स्पर्धेत ४० संघ सहभागी होणार असून, सामना आठ षटकांचा असेल.’’ या वेळी योगेश सूर्यवंशी, इंद्रजित पाटील, संपत पाटील, विशाल शिंदे, रवी बावडेकर, उमेश माने, अभिजित ढेरे उपस्थित होते.