क्रिकेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रिकेट
क्रिकेट

क्रिकेट

sakal_logo
By

लोगो - कोर्ट प्रीमियर लीग
सांगली, जळगाव, कोल्हापूर उपांत्य फेरीत
कोल्हापूर, ता. ३१ : ज्युडीशियल एम्प्लॉयीज स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित ‘कोर्ट प्रीमियर लीग’ राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत सांगली, जळगाव, कोल्हापूर संघाने उपांत्य फेरीत आज प्रवेश केला. उद्या (ता. १) स्पर्धेचा अंतिम दिवस असून उपांत्य व अंतिम फेरीचे सामने शास्त्रीनगर मैदानावर रंगणार आहेत.
आजच्या उपांत्यपूर्व सामन्यात कोल्हापूर संघाने संभाजीनगर उच्च न्यायालय संघावर वीस धावांनी विजय मिळवला. जळगाव विरुद्ध रायगड यांच्यातील सामन्यात जळगाव संघाने रायगडचा दहा धावांनी पराभव केला. तसेच सांगलीने लातूरवर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
तत्पूर्वी झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीत शास्त्रीनगर मैदानावर झालेल्या सामन्यांमध्ये संभाजीनगर उच्च न्यायालय संघाने अकोला संघावर पाच गडी राखून विजय मिळवला. सातारा विरुद्ध रत्नागिरी यांच्यातील सामन्यात साताऱ्याने नऊ गडी राखून रत्नागिरीवर मात केली. कोल्हापूर ''अ'' संघाने नाशिक संघाचा पाच धावांनी पराभव केला. सोलापूर संघाने साताऱ्यावर आठ गडी राखून विजय मिळवला. कोल्हापूर ''अ'' विरुद्ध बुलढाणा यांच्यातील सामन्यात कोल्हापूरने दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला. कोल्हापूर ''अ'' व सोलापूर यांच्यातील सामना टाय झाला.
शाहूपुरी जिमखाना येथे झालेल्या सामन्यात संभाजीनगर उच्च न्यायालय संघाने अकोला संघावर पाच गडी राखून विजय मिळवला. बुलढाणा संघाने वाशिम संघाचा ४६ धावांनी पराभव केला. पॅव्हेलियन मैदान बावडा येथे झालेल्या सामन्यात लातूरने बीड संघावर सोळा धावांनी विजय मिळवला. जळगाव संघाने वर्धा संघावर पाच गडी राखून मात केली. सांगली विरुद्ध मुंबई उच्च न्यायालय यांच्यातील सामन्यात सांगली संघाने २६ धावांनी मुंबईचा पराभव केला.
मेरी वेदर मैदानावर झालेल्या सामन्यात सोलापूर संघाने अहमदनगर संघाचा ४३ धावांनी पराभव केला, तर रायगड संघाने पुणे संघावर नऊ गडी राखून विजय मिळवला.