राज्य संघात प्रथमच कोल्हापूरचे पाचजण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य संघात प्रथमच
कोल्हापूरचे पाचजण
राज्य संघात प्रथमच कोल्हापूरचे पाचजण

राज्य संघात प्रथमच कोल्हापूरचे पाचजण

sakal_logo
By

लोगो ः संतोष ट्रॉफी
राज्य संघात प्रथमच
कोल्हापूरचे पाचजण
कोल्हापूर, ता. २ : येथे शनिवार (ता. ७) पासून होणाऱ्या संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात कोल्हापूरच्या पाच खेळाडूंचा प्रवेश निश्चित झाला आहे. एक खेळाडू प्रतीक्षा यादीवर आहे. पुणे येथील आंतरजिल्हा स्पर्धेतून निवड झालेल्या सातपैकी कोल्हापूरचे पाच खेळाडू राज्य संघातून संतोष ट्रॉफी स्पर्धा खेळणार आहेत. यादीमध्ये श्री शिवाजी तरुण मंडळाचा इंद्रजित चौगुले, पाटाकडील तालीम मंडळाचा यश देवणे, ओंकार पाटील, ऋषिकेश मेथे- पाटील, तर दिलबहार तालीम मंडळाचा पवन माळी यांचा समावेश आहे. श्री शिवाजी तरुण मंडळाचा विशाल पाटील प्रतीक्षेत आहे. संतोष ट्रॉफी स्पर्धेच्या ग्रुप चारचे सामने येथे ७ ते १५ दरम्यान होतील. त्यात सहा संघांचे एकूण १५ सामने होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, छत्तीसगड, दमण व दादरा, हरियाणा आदी संघांचा सहभाग आहे.