विद्यापीठाचे रवी कुमार कॉग्निझंट'' चे प्रमुख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठाचे रवी कुमार कॉग्निझंट'' चे प्रमुख
विद्यापीठाचे रवी कुमार कॉग्निझंट'' चे प्रमुख

विद्यापीठाचे रवी कुमार कॉग्निझंट'' चे प्रमुख

sakal_logo
By

फोटो
....

शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी
रवी कुमार एस. ‘कॉग्निझंट’चे प्रमुख

तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगमध्ये घेतले शिक्षण

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : मूळ भारतीय असणारे रवी कुमार एस. यांची ‘कॉग्निझंट’ या आयटी क्षेत्रातील जागतिक आघाडीच्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली. विशेष म्हणजे ते शिवाजी विद्यापीठाचे पदवीधर आहेत. तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे येथून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली आहे.
विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी कुमार यांनी १९८७ ते १९९१ या कालावधीत शिवाजी विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर १९९६ मध्ये झेवियर्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी एमबीएची पदव्युत्तर पदवी संपादन केली. १९९१ ते १९९४ या काळात बीएआरसीमध्ये त्यांनी ‘क’ वर्ग सायंटिस्ट म्हणून काम केले. त्यानंतर प्राईसवॉटरहाऊसकूपर्स या प्रख्यात कंपनीत सीनिअर कन्सल्टंट, केंब्रिज टेक्नॉलॉजी पार्टनर्स येथे असोसिएट डायरेक्टर व सीआरएम लाईन मॅनेजर, ऑरॅकल कॉर्पोरेशनमध्ये बिझनेस हेड (साऊथ ईस्ट एशिया), सेपियंट कॉर्पोरेशनमध्ये डायरेक्टर (सीआरएम व एससीएम व्हॅल्यू सेट्स), इन्फोसिसमध्ये सीनियर व्हाईस प्रेसिडेंट अशा उच्च पदांवर काम केले आहे. सध्या ते मॅनहॅटन, न्यूयॉर्क (यूएस) इथून इन्फोसिसच्या प्रेसिडेंट पदाची धुरा सांभाळत आहेत.
दरम्यान, कॉग्निझंट ही माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रवीकुमार पदभार स्वीकारणार आहेत. या संस्थेत या पदावर काम करणे हा एक मोठा बहुमान आहे.

-------------
सात मिलियनचे पॅकेज
एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, रवी कुमार यांचे बेसिक वेतन १ मिलीयन अमेरिकी डॉलर असणार आहे, तरी त्यांना मिळणाऱ्या विविध पर्क्स विचारात घेता एकूण वेतन हे ७ मिलियन डॉलरच्या घरात असेल.