विजयासह पश्चिम बंगाल पुढील फेरीत

विजयासह पश्चिम बंगाल पुढील फेरीत

लोगो- संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धा
-
फोटो- 75828 ( ६ कॉलम फोटो), बातमी पोटातील फोटो- 75829
-

विजयासह पश्चिम बंगाल पुढील फेरीत 
-
कर्नाटक, महाराष्ट्र, मिझोरामही दाखल; मध्यप्रदेश-छत्तीसगढ यांच्यातील सामना बरोबरीत 

कोल्हापूर, ता. १५ : ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन आयोजित ७६ व्या संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेत पश्चिम बंगाल, हरियाणा संघानी विजय मिळवला तर मध्यप्रदेश विरुद्ध छत्तीसगढ यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. ड गटाचा अखेरचा सामना येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर झाला.
सामन्याचे उद्घाटन व  एआयएफएफचे जनरल सेक्रेटरी शाजी प्रभाकरन यांचा सत्कार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी समिती सदस्य मालोजीराजे छत्रपती, मधुरीमाराजे छत्रपती यांच्यासह मान्यवर उपस्थितीत होते. येणाऱ्या काळात भारतीय फुटबॉलला चांगल्या स्तरावर नेण्याच काम एआयएफएफकडून होणार आहे. तसेच  कोल्हापूरच्या फुटबॉलच नाव देशपातळीवर आदराने घेतल जाईल यासाठी आपण कार्यरत राहणार असल्याचे मालोजीराजे यांनी सांगितले. 
ड गटातील तुल्यबळ असणाऱ्या संघांची आज अखेरच्या दिवशी मैदानावर गाठ पडली. पश्चिम बंगालविरुद्ध महाराष्ट्र यांच्यातील सामना चुरशीचा झाला. या सामन्यात पश्चिम बंगाल संघाने महाराष्ट्र संघावर २ -१ ने विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघानी आक्रमक खेळ करत गोलसाठी प्रयत्न केले.  पश्चिम बंगालच्या आघाडीच्या फळीतील सुरजित हंसदा याने सामन्याच्या ८ व्या मिनिटाला गोल नोंदवत बंगाल ला १- ० अशी आघाडी मिळवून दिली.  गोलची परतफेड करण्यासाठी महाराष्ट्र संघांने आक्रमण वाढवत बंगाल संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, बंगाल संघाला मिळालेल्या संधीचे गोलमध्ये रूपांतर होण्यास वेळ लागला नाही.  सामन्याच्या ३९ व्या मिनिटाला पश्चिम बंगालच्या दीपक कुमार रजक याने गोल नोंदवत संघाला २-० अशा भक्कम आघाडीवर नेवून ठेवले. उत्तरार्धात गोलची परतफेड करण्यासाठी महाराष्ट्र संघाच्या खेळाडूंनी आक्रमक चाली रचल्या. यामध्ये त्यांच्या अनेक संधी वाया गेल्या.
सामन्याच्या ७८ व्या मिनिटाला महाराष्ट्राच्या आसिफ शेख याने गोल नोंदवत संघावरील आघाडी २ - १ अशी कमी केली. मात्र, या नंतर मिळालेल्या संधीचे रूपांतर गोलमध्ये करण्यात महाराष्ट्र संघाला अपयश आले. अखेर पश्चिम बंगाल संघाने २-१ अशा गोल फरकाने सामना जिंकत स्पर्धेच्या पुढील फेरीसाठी पात्र ठरला. उत्कृष्ट खेळाडू म्हणून बसू डेब मंडी याला गौरवण्यात आले.    
हरियाणा विरुद्ध दमन व दादरा यांच्यातील सामना एकतर्फी ठरला. हरियाणा संघातील हितेश कडियान याने २, तर अतिष आणि जिव्हेश या खेळाडूनी प्रत्येकी एक गोलची नोंद करत संघाला ४-० असे विजयी केले. हरियाणाचा हितेश कडियान उत्कृष्ट खेळाडू ठरला.     
मध्यप्रदेश विरुद्ध छत्तीसगड यांच्यातील सामना अटीतटीचा झाला. सामना २ गोल बरोबरीत राहिला. मध्यप्रदेशच्या ईशान साही याने सामन्याच्या २३ व्या व ८२ व्या मिनिटाला गोल नोंदवले तर छत्तीसगढ च्या उजित सिंग भरकम याने सामन्याच्या ४२ आणि ६० व्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला बरोबरीत आणून ठेवले. शिवांगी याला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.  

फिफाच्या नव्या नियमाचा महाराष्ट्राला फायदा 
फिफाच्या नव्या नियमानुसार महाराष्ट्र संघही पात्र ठरला आहे. पूर्वी प्रत्येक गटातील विजेता संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरत असे. मात्र नव्या नियमानुसार गोल फरक याचा विचार होऊन गटातील उपविजेत्या तीन संघाना पुढील फेरीसाठी पात्र ठरवले आहे. यानुसार कर्नाटक प्रथम, महाराष्ट्र द्वितीय व मिझोराम तृतीय स्थानावर पात्र ठरले आहे. 

चौकट
मैदान फुल्ल 
ड गटातील अखेरचा व चुरशीचा सामना पाहण्यासाठी फुटबॉल शौकीनांनी गर्दी केली. स्थानिक संघाना प्रोत्साहित करणारे प्रेक्षक आज एक दिलाने महाराष्ट्र संघाला प्रोत्साहन देत होते. केएसएने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार १५ हजाराहून अधिक प्रेक्षक मैदानावर उपस्थित होते. 

चौकट
खेळाडूचे असभ्य वर्तन
गोल नोंदवून आघाडी घेतलेल्या पश्चिम बंगाल संघातील खेळाडूने प्रेक्षक गॅलरीकडे फिरत अश्लील हावभाव केले. यावेळी संतप्त झालेल्या प्रेक्षकांनी मैदानाच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या भिरकावल्या. 

चौकट
हुल्लडबाजीचे गालबोट 
स्थानिक सामन्यादरम्यान होणारी हुल्लडबाजी या सामान्याप्रसंगीही झाली. आघाडी घेतलेल्या पश्चिम बंगाल संघातील खेळाडू ड्रेसिंग रूमकडे परतत असताना त्यांच्या दिशेने बाटल्या व चप्पल भिरकवण्यात आले.

चौकट
मैदानावर बँड बाजा
खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी प्रेक्षकांनी मैदानावर बँड आणला होता. महाराष्ट्र संघाने नोंदवलेल्या गोलनंतर मैदानात या बँडचा आवाज घुमू लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com