बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात ​ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात ​
बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात ​

बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात ​

sakal_logo
By

बुद्धिबळ
स्पर्धेला सुरुवात ​

कोल्हापूर​, ता. १५ : कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने जिद्द चेस ॲकॅडमीने आयोजित केलेल्या स्पर्धेचे उद्घाटन कोल्हापूर जीएसटी सहाय्यक आयुक्त व आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू जयांकुर चौगले, अंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटे, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू अनिश गांधी, बुद्धिबळ प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे यांच्या हस्ते झाले.​ ​यावेळी पंच भरत चौगुले, ऋतुराज भोकरे, निहाल मुल्ला,तुषार शर्मा, अभिजीत चव्हाण, सुशांत कांबळे, सुयश जोशी उपस्थित होते.​ स्पर्धेत ​१६८ बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत.​ आज झालेल्या सहाव्या फेरी अखेर अग्रमानांकित कागलचा निहाल मुल्ला, चौथा मानांकित कोल्हापूरचा सोहम खासबारदार, सातवा मानांकित कोल्हापूरचा शर्विल पाटील, विसावा मानांकित पुण्याचा हर्षल पाटील व एकविसावा मानांकित रत्नागिरीचा वरद पेठे हे संयुक्तपणे आघाडीवर आहेत.