
डेटा स्टोरी
विशेष
नंदीनी नरेवाडी
महिला अत्याचाराचा
आलेख चढताच
कोल्हापूर : सध्याचा समाज आधुनिकतिकडे वाटचाल करतोय. सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर दिसतात. मात्र महिलांवरील अत्याचारांचा आलेखही दिवसेंदिवस वाढताना दिसतो. गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचारात सरासरी दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. अल्पवयीन मुलींवर लैगिक अत्याचार रोखण्यासाठी पोक्सोसारखा कडक कायदा आणला, असे असतानाही अत्याचाराच्या घटना काही थांबत नाहीत.
बलात्कार, विनयभंग यासह नवविवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणे असे प्रकार सुरूच आहेत. २०२२ मध्ये जिल्ह्यात दोन नवविवाहितानी आत्महत्या केल्याचे नोंद आहे. तर २०२१मध्ये ६ नवविवाहीता बळी पडल्या. बलात्काराचे ६१९ तर, विनयभंगाचे १२५८ गुन्हे दाखल झाले. गुन्ह्यांची आकडेवारी अधिक असली तरी यामागील कारणे मात्र वेगवेगळी असल्याचे दिसते.
महिला, अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांना आळा बसावा यासाठी कायदे कठोर केले आहेत. तरीही अत्याचाराच्या घटना थांबत नाहीत. लैगिक अत्याचाराबरोबरच हुंडयासाठी तसेच इतर कारणांसाठीदेखील महिलांचा छळ होत आहे. गुन्ह्यांचा आकडा वाढणे हे चिंताजनक असले तरी याआधी जनजागृतीअभावी शारीरिक, मानसिक आणि लैंगिक छळ सहन केला जात होता. वाढत्या जनजागृतीमुळे महिला, अल्पवयीन मुलींचे पालक तक्रार करण्यासाठी पुढे येत असल्याने गुन्ह्यांची आकडेवारी वाढल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांच्या आरोपींमध्ये ओळखीतील आरोपींचे प्रमाण अधिक आहे.
दृष्टीक्षेपात
*२०२१*२०२२
नवविवाहिता आत्महत्या*६*२
बलात्कार*१७८*१९७
---------
ग्राफ
विनयभंगाच्या घटना
२०२१...३४९
२०२२....३६६
-------
चौकट
बहुतांश अत्याचार शेजारी, नातेवाईकांकडून
महिलांना ओळखीच्या लोकांकडून तसेच नातेवाईक, शेजारी लोकांकडून अत्याचाराला सामोरे जावे लागते. घरातूनच त्यांना गैरप्रकार सहन करावे लागतात.
------
कोट
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी महिलांना अन्याय अत्याचार यांना सामोरे जावे लागत असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी त्यांना १०९१ हा टोल फ्री क्रमांक तसेच पोलिसांना भेटून आणि ई मेल वर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे महिलांना तत्काळ मदत देणे सोपे बनले आहे.
- श्रद्धा आमले, महिला सहाय्यता कक्ष, सहायक पोलिस निरीक्षक