फुटबॉल

फुटबॉल

80932

‘श्री शिवाजी तरुण’विरुद्ध बालगोपाल, फुलेवाडीविरुद्ध झुंजार क्लब सामने ‘टाय’
-
सोमवार ठरला बरोबरीचा

कोल्हापूर, ता. ६ : श्रीमंत शाहू छत्रपती फुटबॉल लीग स्पर्धेतील आजचा दिवस बरोबरीचा ठरला. श्री शिवाजी तरुण मंडळविरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यातील सामना गोल एक बरोबरीत राहिला, तर फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळविरुद्ध झुंजार क्लब यांच्यातील सामना गोल शून्य बरोबरीत झाला. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा सुरू आहे. 
श्री शिवाजी तरुण मंडळविरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यातील सामना चुरशीचा झाला. सामान्यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत दोन्ही संघांकडून विजयी गोल नोंदवत स्पर्धेत महत्त्‍वपूर्ण गुण कमावण्यासाठी चढाओढ लागली होती. आक्रमक खेळ करणाऱ्या तरुण मंडळाने उत्कृष्ट चाली रचत बालगोपाल संघाची बचावफळी भेदली. यात यश येऊन सामान्यांच्या ७ व्या मिनिटाला एन. कौसी याने गोल नोंदवत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर पुन्हा गोल नोंदवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. यानंतर २३ व्या मिनिटाला बालगोपालच्या संघाला फ्री किक बहाल केली. यावर रोहित कुरणे याने गोल नोंदवत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. सामान्याच्या उत्तरार्धात दोन्ही संघानी आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी संघावर आघाडी मिळवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही. बालगोपालच्या खेळाडूने फटकावलेला चेंडू तरुण मंडळच्या गोलरक्षकाला चकवत गोल जाळी भेदणार इतक्यात चपळाईने तरुण मंडळच्या योगेश कदम याने हा चेंडू बाजूला ढकलला. अखेरपर्यंत गोल एक हीच आघाडी कायम राहत सामना बरोबरीत सुटला.      
फुलेवाडीविरुद्ध झुंजार क्लब यांच्यातील सामना गोल शून्य बरोबरीत राहिला. दोन्ही संघांच्या सयंमी खेळामुळे प्रतिस्पर्धी संघाच्या चाली रोखण्यात यश येत होते. फुलेवाडीच्या अरबाज पेंढारी, अक्षय मंडलिक व चंदन गवळी यांच्या तर झुंजार क्लबच्या ओंकार भोजे, अवधूत पाटोळे व विशाल सासणे यांनी चांगला खेळ केला. अखेरपर्यंत गोल शून्य बरोबरीत राहिला. 

चौकट
आजचे सामने 
दुपारी २ वाजता : कोल्हापूर पोलिसविरुद्ध ऋणमुक्तेश्वर तालीम 
सायंकाळी ४ वाजता : दिलबहार तालीमविरुद्ध पीटीएम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com