दिलबहार , कोल्हापूर पोलीस चा विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिलबहार , कोल्हापूर पोलीस चा विजय
दिलबहार , कोल्हापूर पोलीस चा विजय

दिलबहार , कोल्हापूर पोलीस चा विजय

sakal_logo
By

81159
-
कोल्हापूर पोलिसचा ‘ऋणमुक्तेश्वर’वर विजय
-
दिलबहार तालीम मंडळाची ‘पीटीएम’वर मात; गुणतालिकेत अव्वल स्थान

कोल्हापूर, ता. ७ : श्रीमंत शाहू छत्रपती फुटबॉल लीग स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळाने पाटाकडील तालीम मंडळवर ३ -१ ने विजय मिळवला, तर कोल्हापूर पोलिस संघाने ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ संघावर ३-० ने विजय मिळवला. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा सुरु आहे.
दिलबहारविरुद्ध पीटीएम यांच्यातील सामना दिलबहारने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. पीटीएमने आक्रमक खेळ करत सामान्यवर मजबूत पकड घेतली. यातच १२ व्या मिनिटाला प्रथमेश हेरेकर याने गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली. दिलबहारचे अनेक प्रयत्न अयशस्वी झाले. पूर्वार्धात पीटीएम एक गोलसह आघाडीवर राहिले. उत्तरार्धात दिलबहारच्या नियोजनातील बदल मैदानावर दिसले. अक्रमक तितक्याच चपळ खेळामुळे संपूर्ण सामना पलटला. स्वयंम साळोखे याने ४५ व्या मिनिटाला गोल नोंदवत सामना बरोबरीत आणला तर काही वेळातच ४९ व्या मिनिटाला इम्यानुअल इचिबेरी याने गोल नोंदवत सामन्यात २ - १ अशी आघाडी घेतली. थोड्या वेळानंतर सामन्याच्या ६८ व्या मिनिटाला स्वयंम साळोखे याने वयक्तिक दुसरा तर संघासाठी तिसऱ्या गोलची नोंद केली. अखेरपर्यंत हाच गोल फरक राहून दिलबहारने सामना जिंकला.
कोल्हापूर पोलिस संघाने ऋणमुक्तेश्वर तालीमवर ३-० ने विजय मिळवला. पोलिस संघाने शॉर्ट पासिंगचा अवलंब करत ऋणमुक्तेश्वरच्या मध्य व बचाव फळीला जेरीस णले. मात्र, गोल नोंदवता आले नाही. सामान्यांच्या २१ व्या मिनिटाला प्रथमेश साळोखे याने गोल नोंदवत सामन्यात १ -० अशी आघाडी घेतली तर लगेचच २९ व्या मिनिटाला गोल नोंदवून वयक्तिक व संघासाठी दुसऱ्या गोलची नोंद केली. पूर्वार्ध२ -० असा राहिला. ऋणमुक्तेश्वर संघाने गोलफरक कमी करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यास यश आले नाही. सामान्याच्या अधिकच्या वेळेत आफताब मुल्ला याने गोल नोंदवून सामना ३-० असा जिंकला.

चौकट
आजचे सामने
दुपारी २ वाजता : सम्राटनगर स्पोर्ट्स विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ
सायंकाळी ४ वाजता : खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध बीजीएम स्पोर्टस्