शाहू स्पोर्ट्स व केडीसीए १४ वर्षाखालील संघ विजयी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहू स्पोर्ट्स व केडीसीए १४ वर्षाखालील संघ विजयी
शाहू स्पोर्ट्स व केडीसीए १४ वर्षाखालील संघ विजयी

शाहू स्पोर्ट्स व केडीसीए १४ वर्षाखालील संघ विजयी

sakal_logo
By

लोगो- वसंतराव चौगुले ब गट क्रिकेट स्पर्धा
--

शाहू स्पोर्टस् ॲकॅडमी, केडीसीए संघ विजयी
कोल्हापूर, ता. १४ : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित व श्री वसंतराव चौगुले नागरी सहकारी पंतसंस्थेच्या वसंतराव चौगुले ब गट क्रिकेट स्पर्धेतील आजचा सामना एस पी किकेट क्लब, चंदगड विरूद्ध केडीसीए १४ वर्षाखालील संघ यांच्यामध्ये झाला. सामन्यात केडीसीए १४ वर्षाखालील संघाने एका धावेने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना केडीसीएने ४० षटकांत ९ बाद २३६ धावा केल्या. यामध्ये धैर्यशील पाटील ४४, प्रणित पोवार ४०, शौर्य कोरोचीकर २७ धावा केल्या. एस पी क्रिकेट क्लबकडून राकेश चिलमेने ३, सिध्देश गावडेने २, जोतीबा पाटील व भिमराव कांबळे यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. उत्तरादाखल एस पी किकेट क्लबने ३६.२ षटकांत सर्वबाद २३५ धावा केल्या. यामध्ये राकेश चिलमे १२८, विशाल कांबळे २५, वैभव जाधव १५ धावा केल्या. केडीसीएकडून रूद्र लोंढेने ३, धैर्यशील पाटील, पियुष सुर्यवंशी व ऋषी वसा यांनी प्रत्येकी २, प्रणित पोवारने १ बळी घेतला.
दुसरा सामना शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज मैदान येथे सामना शाहू स्पोर्टस् ॲकॅडमी विरूद्ध पॅकर्स क्रिकेट क्लब ब यांच्या मध्ये झाला. सामन्यात शाहू स्पोर्टस् ॲकॅडमीने ५ विकेटनी विजय मिळवला. प्रथम फलदांजी करताना पॅकर्स क्रिकेट क्लबने ३२.५ षटकांत सर्वबाद १५८ धावा केल्या. यामध्ये वैभव अपराध ४५, कार्तीक पाटील १५, सतिश कुशवाह १२ धावा केल्या. शाहू स्पोर्टस् ॲकॅडमीकडून देवेश वराडेने ४, सुरज तिवले व रितेश नायकवडी यांनी प्रत्येकी २, विशाल पाटील व विनायक पाटील यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. शाहू स्पोर्टस् ॲकॅडमीने १९.५ षटकांत ५ बाद १५१ धावा केल्या. यामध्य विशाल पाटील ७४, रितेश नायकवडी ३४ व प्रविण गावडे नाबाद १६ धावा केल्या. पॅकर्स क्रिकेट क्लब ‘ब’कडून वैभव अपराधने ३ व जुनेद मलबारीने २ बळी घेतले.