फुटबॉल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुटबॉल
फुटबॉल

फुटबॉल

sakal_logo
By

लोगो - श्रीमंत शाहू छत्रपती फुटबॉल लीग
83300
कोल्हापूर : शाहू छत्रपती के. एस. ए. चषक फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस विरुद्ध बीजीएम स्पोर्टस् यांच्या सामन्यातील क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा).

बीजीएमविरुद्ध प्रॅक्टिस विजयी
वाघाची तालीम मंडळाची सम्राटनगर स्पोर्टस् वर ६ विरुद्ध १ गोलफरकाने मात
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : शाहू छत्रपती केएसए चषक वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने बीजीएम स्पोर्टसचा ४ विरुद्ध १, तर
उत्तरेश्‍वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळाने सम्राटनगर स्पोर्टसचा ६ विरुद्ध १ गोलफरकाने पराभव केला. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले आहे.
प्रॅक्टिसने बीजीएमच्या खेळाडूंना आक्रमणाच्या जादा संधी दिल्या नाहीत. उलट, प्रॅक्टिसच्या चढाया रोखताना बीजीएमच्या खेळाडूंचा कस लागला. प्रॅक्टिसकडून ज्युलिएस स्ट्रोने १४ व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवून क्लबचे इरादे स्पष्ट केले. त्यानंतर चिमाने २८ व २९ व्या मिनिटाला सलग दोन गोल केल्याने बीजीएमच्या खेळाडूंवर दबाव वाढला. पुन्हा रोहित भोसलेने ३२ व्या मिनिटाला गोल केल्याने, उत्तरार्धात प्रॅक्टिस किती गोल करणार, याची उत्सुकता वाढली. उत्तरार्धात बीजीएमच्या खेळाडूंनी बचावफळीवर लक्ष केंद्रित केले. प्रॅक्टिसच्या चढाया रोखून त्यांनी जादा गोल होणार नाहीत, याची दक्षता घेतली. बीजीएमकडून केवल कांबळेने जादा वेळेत गोल नोंदवला.
तत्पूर्वीच्या सामन्यात उत्तरेश्‍वरने एकतर्फी बाजी मारली. त्यांच्या अक्षय शिंदेने ९ व्या मिनिटाला गोल केल्यानंतर उत्तरेश्‍वरच्या समर्थकांनी जल्लोष केला. दोन मिनिटांच्या अंतराने पुन्हा प्रतिक कांबळेने सम्राटनगर स्पोर्टसच्या गोलजाळीच्या दिशेने चाल केली. त्याने उत्तरेश्‍वरसाठी दुसऱ्या गोलची नोंद केली. सम्राटनगरकडून अभिराज काटकरने १३ व्या मिनिटाला गोल करून संघावरील गोलचे ओझे एकने कमी केली. त्याचा फारसा फायदा झाला नाही. उलट, उत्तरेश्‍वरच्या खेळाडूंनी आक्रमणाची धार वाढवली. त्यांच्या अमित सुतारने १४ व्या, यश चव्हाण २८ व्या, तर अमित सुतारने ३२ व्या मिनिटाला गोल करत सम्राटनगरच्या बचावफळीला धक्के दिले. उत्तरार्धात उत्तरेश्‍वरने बचावात्मक खेळ केला. त्यांच्या इंद्रजित शिंदेने ७८ व्या मिनिटाला गोल केला.
-------------
आजचे सामने
- ऋणमुक्तेश्‍वर तालीम मंडळ विरुद्ध झुंजार क्लब- वेळ - २ वाजता.
- पाटाकडील तालीम मंडळ (अ) विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ- वेळ - दुपारी ४ वाजता.