खेलो इंडिया १७ वर्षाखालील लीगचे छत्रपती वॉरिअर्स विजेते

खेलो इंडिया १७ वर्षाखालील लीगचे छत्रपती वॉरिअर्स विजेते

खेलो इंडिया लीगचे छत्रपती वॉरिअर्स विजेते
कोल्हापूर, ता. १८ : खेलो इंडिया १७ वर्षांखालील लीग स्पर्धेमध्ये छत्रपती वॉरियर्स संघाने विजेतेपद पटकावले, तर श्री काडसिद्धेश्‍वर हायस्कूल उपविजेते ठरले.
न्यू पॅलेस पोलो ग्राउंड येथे ही स्पर्धा झाली. या लीग स्पर्धेमध्ये सहा संघानी सहभाग घेतला होता. एकूण ३० सामने होऊन छत्रपती वॉरियर्स संघाने ३० गुण मिळवून विजेतेपद पटकाविले, तर श्री काडसिद्धेश्‍वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर यांना २२ गुणांसह उपविजेतेपद पटकावले.
विजेत्यांना मालोजीराजे छत्रपती व मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते रोख रक्कम व कायमस्वरूपी ट्रॉफी देण्यात आली. लीगमधील उत्कृष्ट तीन खेळाडू बेस्ट फॉरवर्ड अनुष्का कांबळे (काडसिद्धेश्‍वर), बेस्ट गोलकीपर प्रत्युषा नलवडे (छत्रपती वॉरियर्स), प्लेयर ऑफ द टूर्नामेंट साधना खाडे (उषाराजे) यांना ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. या वेळी के. एस. ए. चे पदाधिकारी माणिक मंडलिक, नंदकुमार बामणे, राजेंद्र दळवी, सदस्य नितीन जाधव, संभाजी पाटील मांगोरे, विश्‍वंभर मालेकर, संग्राम यादव, दिग्विजय राजेभोसले, मनोज जाधव, दीपक घोडके, प्रदीप साळोखे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com