महावितरण आवाहन

महावितरण आवाहन

निवृत्ती वेतनाबाबत महावितरणचे निवेदन
कोल्हापूर, ता. २३ : जे कर्मचारी १ सप्टेंबर २०१४ ला कर्मचारी निवृत्ती वेतन १९९५ योजनेचे सदस्य असून, निवृत्ती वेतन प्रत्यक्ष वेतनावर घेण्यासाठी इच्छुक आहेत, अशा कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज संबंधित कार्यालयांत जमा करावेत, असे महावितरणतर्फे आवाहन केले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांनी सादर केलेले संयुक्त पर्यायी अर्ज सध्या कार्यरत असलेल्या कार्यालयाच्या ठिकाणी अथवा सेवानिवृत्त झालेल्या कार्यालयांत २७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर, प्रत्यक्ष वेतनावरील कंपनीचा ८.३३ टक्के वाटा विहित व्याजासह कर्मचारी भविष्य निर्वाह निधी पेन्शन फंडात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, भविष्य निर्वाह निधी विश्वस्त मंडळाद्वारे जमा करण्यात येणार आहे. १९९५ पासून सर्व कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्या भविष्य निर्वाह निधीबाबतची माहिती भविष्यनिर्वाह मंडळाच्या (https://cpf1.mahadiscom.in/CpfWebProject/) CPF HR Report मध्ये उपलब्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com