
रेंदाळचा श्रीराज भोसले अजिंक्य
लोगो - खासदार चषक"खुल्या बुद्धिबळ स्पर्धा
12152
कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांच्या समवेत स्पर्धेचे विजेते , पृथ्वीराज महाडिक, भरत चौगुले, मनीष मारूलकर, आरती मोदी, पोर्णिमा उपळवेकर व उमेश पाटील.
रेंदाळचा श्रीराज भोसले अजिंक्य
पुण्याचा निखिल दीक्षित उपविजेता; कोल्हापूरचा सम्मेद तृतीय
कोल्हापूर, ता. २१ : खासदार चषक खुल्या जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम नवव्या फेरीनंतर आठवा मानांकित रेंदाळचा श्रीराज भोसले तृतीय मानांकित पुण्याचा निखिल दीक्षित व अग्रमानांकित कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटे या तिघांचे समान आठ गुण झाल्यामुळे सरस टाय ब्रेक गुणामुळे रेंदाळचा श्रीराज भोसले अजिंक्य ठरला, तर पुण्याच्या निखिल दीक्षितला उपविजेते पदावर व अग्रमानांकित कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटेला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. विजेत्यांना खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते रोख बक्षीस व मानचिन्हाने गौरवण्यात आले.
स्पर्धा स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण नऊ फेऱ्यात झाल्या. या वेळी पृथ्वीराज महाडिक ,महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव भरत चौगुले, मुख्य स्पर्धा संचालक मनीष मारुलकर, स्पर्धा सचिव धीरज वैद्य, स्पर्धा समन्वयक उमेश पाटील सर व उत्कर्ष लोमटे उपस्थित होते.