नवनाथ मंडळ "लोकनाथ चषक"चा मानकरी

नवनाथ मंडळ "लोकनाथ चषक"चा मानकरी

12156
कोल्हापूर : नवनाथ मित्र मंडळ संघाला लोकनाथ चषक प्रदान करताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, ऋतुराज क्षीरसागर व अन्य.

‘लोकनाथ चषक’चा
‘नवनाथ’ मानकरी
कोल्हापूर, ता. २१ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कसबा बावडा विभागातर्फे आयोजित ‘लोकनाथ चषक’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात थरारक विजय मिळवत नवनाथ मित्र मंडळ प्रणित झेंडा चौकाने विजेतेपदावर मोहर उमटवली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते विजेते उपविजेते संघाला गौरवण्यात आले.
शिवसेना पक्षातर्फे कसबा बावडा विभागातर्फे ‘लोकनाथ चषक’ जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा झाल्या. अंतिम सामना नवनाथ मित्र मंडळ प्रणित झेंडा चौक विरुद्ध कै. सिद्धार्थ लोट प्रणित गोळीबार मैदान यांच्यामध्ये प्रकाश झोतात रंगला. या सामन्यात झेंडा चौक संघाने प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत चषक पटकावला. या वेळी उत्तर शहरप्रमुख रणजीत जाधव, उदय भोसले, किशोर घाटगे, शहर समन्वयक सुनील जाधव, अंकुश निपाणीकर, उपशहरप्रमुख रोहन उलपे, विराज खाडे, सुरज सुतार, उत्तम रंगापुरे, कृष्णा लोंढे, आदर्श जाधव, राकेश चव्हाण, सचिन पाटील, अभिजित केंबळे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com