बीजीएम चा विजय

बीजीएम चा विजय

लोगो - सतेज चषक फुटबॉल स्पर्धा
84686
कोल्हापूर : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत बीजीएम विरुद्ध झुंझार क्लब यांच्या सामन्यातील क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

‘बीजीएम’चा विजय 
कोल्हापूर, ता. २२ : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात बीजीएम स्पोर्ट्स संघाने झुंजार क्लब संघावर २ - १ गोल फरकाने विजय मिळवला. पाटाकडील तालीम मंडळ आयोजित कै. पांडबा जाधव व कै. रावसाहेब सरनाईक स्मृती प्रित्यर्थ ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे.
बीजीएम विरुद्ध झुंजार यांच्यातील सामना अटीतटीचा झाला. झुंजारने आक्रमक सुरुवात करत सामन्यात आघाडी घेतली. सामन्याच्या २० व्या मिनिटाला राजेश बोडेकर याने गोल नोंदवत सामना १ - ० असा केला. या नंतर ‘बीजीएम’ने आक्रमक चाली रचल्या यात ३४ व्या मिनिटाला यश आले. वैभव राऊत याने गोल नोंदवत सामना एक गोल बरोबरीत आणला.  उत्तरार्धात दोन्ही संघ गोलसाठी प्रयत्न करत राहिले मात्र यश आले नाही. सामना संपायला काही वेळ शिल्लक असताना अधिकच्या वेळेत ‘बीजीएम’च्या हमीद बालोगन याने गोले नोंदवत संघाला विजय मिळवून दिला. लढवय्या खेळाडू म्हणून ‘झुंजार’च्या राजेश बोडेकर याला गौरवण्यात आले. 
--------
चौकट 
चार खेळाडूंना रेड कार्ड
मैदानावर गैरवर्तन करणाऱ्या खेळाडूंना पंचानी रेडकार्ड बहाल केले. यामध्ये ‘बीजीएम’च्या अभिजित साळोखे व राखीव खेळाडू महेश जमादार यांना, तर ‘झुंजार’च्या सूर्यप्रकाश सासणे व अवधूत पाटील यांचा समावेश आहे.
------------
आजचा सामना
फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com