कबड्डी स्पर्धेत छावा मंडळ विजेते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कबड्डी स्पर्धेत छावा मंडळ विजेते
कबड्डी स्पर्धेत छावा मंडळ विजेते

कबड्डी स्पर्धेत छावा मंडळ विजेते

sakal_logo
By

12169
कोल्हापूर : कदमवाडी येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेतील विजेते संघ व मान्यवर.

कबड्डी स्पर्धेत छावा मंडळ विजेते
कोल्हापूर, ता. २२ : शिवजयंती निमित्त कदमवाडी येथे झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत छावा मंडळ पुलाची शिरोली संघाने प्रथम क्रमांक पटकावला. हिंदवी मंडळ कौलव द्व‍ितीय, तर एस. एम. जोशी कला क्रीडा मंडळ, व्ही.टी.एम स्पोर्ट्स कदमवाडी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या संघाला रोख बक्षीस व शिल्ड देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. एस. एम. जोशी कला-क्रीडा मंडळ आणि विठ्ठल तरुण मंडळाने स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत २५ संघ सहभागी झाले होते. पंच म्हणून संदीप लवटे, संभाजी गावडे, रमजान देसाई, युवराज गावडे, किशोर दंडवते यांनी काम पाहिले.
उत्कृष्ट खेळाडू -अभिजित निंबाळकर (हिंदवी कौलव), उत्कृष्ट चढाई-सर्वेश नेरे (छावा शिरोली), उत्कृष्ट पकड-पारस सरनाईक (एस. एम. जोशी कला क्रीडा मंडळ, व्ही. टी. एम स्पोर्ट्स कदमवाडी) या खेळाडूंना वैयक्तिक बक्षीस व शिल्ड देण्यात आले. या वेळी सुसंस्कार शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रियाज मगदूम, रुबिना अन्सारी, इरफान अन्सारी, विजय भोगम, कुमार आहुजा, दर्शन गोरे, गणेश शिंदे, अरविंद मेढे, निलेश पाटील, मिलिंद गोटडके, सिद्धेश मोरे, आतिश नागदा, रोहित पन्हाळकर, राहूल कमारी, अमन मुजावर, आदित्य समुद्रे, आनंदा फाले, पवन शहापुरे, प्रणव सरनाईक, महेश कांबळे, शशांक खवरे, अलोख चव्हाण, पृथ्वीराज शिंदे, नीरज पाटील, अजिंक्य सरनाईक, ओमकार खवरे, श्याम घुगरे, शोएब बेपारी आदी उपस्थित होते.