फुलेवाडी मंडळाची ‘संध्यामठ’ मात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुलेवाडी मंडळाची ‘संध्यामठ’ मात
फुलेवाडी मंडळाची ‘संध्यामठ’ मात

फुलेवाडी मंडळाची ‘संध्यामठ’ मात

sakal_logo
By

लोगो - सतेज चषक फुटबॉल स्पर्धा
84931
कोल्हापूर : सतेज चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ विरूद्ध संध्यामठ तरूण मंडळ यांच्यात झालेल्या सामन्यातील एक क्षण.


फुलेवाडी मंडळाची ‘संध्यामठ’ मात
टायब्रेकरवर ४ विरुद्ध २ गोलफरकाने विजय
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने संध्यामठ तरुण मंडळावर टायब्रेकरवर ४ विरुद्ध २ गोलफरकाने आज मात केली. उत्तरार्धात संध्यामठने आघाडी घेत फुलेवाडीच्या खेळाडूंना घाम फोडला होता. अखेरच्या क्षणात फुलेवाडीकडून स्टॅन्लेने गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. टायब्रेकरवर संध्यामठला करिष्मा करता आला नाही. पाटाकडील तालीम मंडळ व डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे सतेज चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले आहे.
फुलेवाडीच्या खेळाडूंनी पूर्वार्धात सातत्यपूर्ण चढाया केल्या. त्यांच्या खेळाडूंना संध्यामठच्या बचावफळीने रोखून धरले. फुलेवाडीच्या स्टॅन्लेने ३८ व्या मिनिटाला गोल नोंदवून संध्यामठला धक्का दिला. संध्यामठच्या खेळाडूंनी बचावावर लक्ष केंद्रित करत खेळ केला. उत्तरार्धात संध्यामठच्या ओमकार पाटील याला फुलेवाडीच्या खेळाडूने धोकादायकरित्या अडवले. मुख्य पंचांनी संध्यामठला पेन्लटी किक बहाल केल्यानंतर आशिष पाटीलने ६० व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर संध्यामठकडून किरण कावणेकरने ७४ व्या मिनिटाला केलेला गोल डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. त्याने मध्यरेषेपासून मारलेला चेंडू फुलेवाडीच्या गोलखांबाला लागून गोलजाळीत शिरला. तो फुलेवाडीच्या गोलरक्षकाला अडवता आला नाही. या गोलने मात्र फुलेवाडीच्या खेळाडूंवरील दबाव वाढला. त्यांनी हरप्रकारे गोल करण्यासाठी प्रयत्न केले. संध्यामठचा गोलरक्षक विनायक शिंदे यांनी उत्कृष्ट गोलक्षेत्ररक्षण करत संघावरील आक्रमणे परतवून लावली. जादा वेळेत फुलेवाडीच्या स्टॅन्लेने हेडद्वारे गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. पूर्णवेळेत सामना २-२ने बरोबरीत राहिल्याने टायब्रेकरवर खेळविण्यात आला.
-----------------
टायब्रेकर असा
फुलेवाडी*संध्यामठ
अक्षय मंडलिक - गोल*आशिष पाटील - चेंडू अडवला
स्टॅन्ले - चेंडू खांबाला लागून बाहेर*सौरभ हारुगले - गोल
सिद्धेश यादव - गोल*इम्रान बांदार - गोल
अरबाज पेंढारी - गोल*स्वराज्य सरनाईक - चेंडू गोलजाळीबाहेर
रोहित मंडलिक - गोल*-
------------------
चौकट
खेळाडूला दुखापत
फुलेवाडीच्या मोठ्या डीत शिरकाव केल्यानंतर ओमकार पाटील याला फुलेवाडीच्या खेळाडूने धोकादायकरित्या अडवले. त्यात ओमकार उजव्या खांद्यावर मैदानावर पडला. त्याला गंभीर दुखापत झाल्याने तत्काळ रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
----------------
आजचा सामना
- बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध कोल्हापूर पोलिस फुटबॉल संघ, वेळ - दुपारी ४ : ०० वाजता
--------------
लढवय्या खेळाडू - विनायक शिंदे गोलरक्षक