बौद्धिक अक्षम मुलांच्या पालकांची शनिवारपासून राज्यस्तरीय परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बौद्धिक अक्षम मुलांच्या पालकांची  शनिवारपासून राज्यस्तरीय परिषद
बौद्धिक अक्षम मुलांच्या पालकांची शनिवारपासून राज्यस्तरीय परिषद

बौद्धिक अक्षम मुलांच्या पालकांची शनिवारपासून राज्यस्तरीय परिषद

sakal_logo
By

बौद्धिक अक्षम मुलांच्या पालकांची
शनिवारपासून राज्यस्तरीय परिषद


कोल्हापूर, ता. २४ : बौद्धिक अक्षम मूल घरात जन्माला आले की त्याच्या संगोपनाची विशेष जबाबदारी त्याच्या मातापित्यांवर येते. मात्र, हे पालक त्यांच्या संगोपनाच्या शिक्षणाच्या बाबतीत अनभिज्ञ असतात. पालकांना मार्गदर्शन करून योग्य दिशा दाखवण्यासाठी शनिवारी (ता. 4) व रविवारी (ता. 5) उमेद परिवार व चेतना अपंगमती विकास संस्थेतर्फे पंधराव्या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन केले आहे, अशी माहिती चेतना अपंगमती विकास संस्थेचे अध्यक्ष दिलीप बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत विश्व पंढरी, आयटी पार्क रोड येथे ही परिषद होईल. या परिषदेत विविध चर्चासत्रे होणार असून, यामध्ये छोट्या कुटुंब व्यवस्थेमुळे बौद्धिक अक्षम मुलांच्या संगोपनात निर्माण होणाऱ्या समस्या व उपाय, बौद्धिक अक्षम मुलांच्या पुनर्वसनासाठी पालकांचा पुढाकार, अपंग व्यक्ती व पालक यांना शासनातर्फे मिळणाऱ्या सोयी व सवलती, बौद्धिक अक्षम मुलांच्या पालकांचे सामाजिक व मानसिक स्वास्थ्य, बौद्धिक अक्षय मुलांच्या प्रगतीत अभ्यासेतर विषयांचे महत्त्व, बौद्धिक अक्षम मुलांच्या भावंडांची जबाबदारी अपेक्षा आणि वास्तव, बौद्धिक अक्षमता आणि लैंगिकता समज गैरसमज उपाय या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये पालक, शिक्षक, विशेषज्ञ, डॉक्टर यांचा सहभाग असेल.
उपाध्यक्ष डॉ. सुनील पाटील, कार्याध्यक्ष पवन खेबुडकर, निलेश वालावलकर उपस्थित होते.
-----
चौकट
यासाठी आयोजन
जिल्ह्यात सुमारे सात ते आठ हजार बौद्धिक अक्षम मुले आहेत. या मुलांच्या संगोपन आणि शिक्षणाविषयी प्रबोधन करण्यासाठी या परिषदेचे आयोजन केले आहे. त्यांच्या संगोपनाबाबत पालकांचे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे त्यामुळे पालकांसाठी ही परिषद घेण्यात येत असल्याचे बापट यांनी सांगितले.