अशोक कुलकर्णी स्मृती बुद्धिबळ स्पर्धा रविवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अशोक कुलकर्णी स्मृती 
बुद्धिबळ स्पर्धा रविवारी
अशोक कुलकर्णी स्मृती बुद्धिबळ स्पर्धा रविवारी

अशोक कुलकर्णी स्मृती बुद्धिबळ स्पर्धा रविवारी

sakal_logo
By

अशोक कुलकर्णी स्मृती
बुद्धिबळ स्पर्धा रविवारी
कोल्हापूर, ता. २५ : अशोक कुलकर्णी स्मृती तिसऱ्या खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन रविवारी (ता. २६) केले. श्री कृष्ण सरस्वती मंगल कार्यालय, जरगनगर येथे ही स्पर्धा स्विस लीग पद्धतीने नऊ फेऱ्यांत होणार आहेत. कोल्हापुरातील बुद्धिबळपटू कै. अशोक कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ आनंद कुलकर्णी, गुळवणी व ठाकूर परिवाराने या स्पर्धा प्रायोजित केल्या आहेत. स्पर्धेचे उद्‍घाटन रविवारी (ता. २६) सकाळी साडेनऊ वाजता सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार व आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू व प्रशिक्षक जयंत गोखले यांच्या हस्ते व महावितरणचे मुख्य अभियंता परेश भागवत व अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण मराठे व श्री महालक्ष्मी सहकारी बँकेचे अध्यक्ष विनोद डिग्रजकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. इच्छुक बुद्धिबळपटूंनी असोसिएशनशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.