
फुटबॉल
फोटो- 85069
-
लोगो- सतेज चषक फुटबॉल स्पर्धा
-
बालगोपालचा कोल्हापूर पोलिसवर विजय
व्हिक्टरने नोंदवली हंगामातील पहिली हॅटट्रिक; ऋषिकेश डावरीचे दोन गोल
कोल्हापूर, ता. २४ : धडाकेबाज खेळ करणाऱ्या व्हिक्टरने हंगामातील पहिली हॅटट्रिक नोंदवत बालगोपाल संघाला मोठा विजय मिळवून दिला, तर पाठोपाठ ऋषिकेश डावरीचे २ गोल सामन्यावर कळस चढवणारे ठरले. एकतर्फी झालेल्या या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळ संघाने कोल्हापूर पोलिस संघावर ५-१ गोल फरकाने विजय साजरा केला. पाटाकडील तालीम मंडळ आयोजित सतेज चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरु आहे.
बालगोपाल विरुद्ध पोलिस संघातील सामना एकतर्फी झाला. सामन्यात पोलिस संघाने आक्रमक चाली रचल्या. बालगोपाल संघाची मध्यफळी व बचवफळी सातत्याने भेदणाऱ्या पोलिस संघाने बालगोपाल संघावर दबाव निर्माण केला. यातच सामन्याच्या १५ व्या मिनिटाला सागर भोसले याने गोल नोंदवत पोलिस संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, या नंतर बालगोपाल संघाने रणनीती बदलत आक्रमक खेळ केला. यात यश आले. व्हिक्टरने २९ व्या मिनिटाला गोल नोंदवून सामना १-१ असा बरोबरीत केला. सामन्याचा पूर्वार्ध बरोबरीचाच राहिला. उत्तरार्धात आक्रमक चाली कायम ठेवत बालगोपाल संघ आघाडीवर राहिला. यात व्हिक्टरने ५९ व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवत आघाडी घेतली. तर ६८ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर जोरदार फटका मारत व्हिकटरने संघासाठी व स्वतःचीही हॅट्रिक साधली. यानंतर व्हिक्टरला दुखापत झाल्याने तो मध्यफळीत खेळला. मात्र, ऋषिकेश डवरी याने मोर्चा सांभाळत ७५ व्या मिनिटाला व गोल रक्षकाला चकवत अधिकच्या वेळेत असे दोन गोल नोंदवले. पूर्ण वेळ ५ - १ असा गोल फरक राहून बालगोपाल संघाने विजयाची नोंद केली. पोलिस संघाच्या सागर भोसले याला लढवय्या खेळाडू म्हणून गौरवण्यात आले, तर चुकीचा खेळ केल्याबद्दल पोलिस संघाच्या प्रदीप भोसले याला दोन यलो कार्ड दिल्याने एक सामना बंदीची कारवाई करण्यात आली.
चौकट
आजचा सामना
पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ