
वृत्तपत्र विक्रेता एजंट्स व व्यावसायिकांचा २ मार्चला धडक मोर्चा
12203
वृत्तपत्र विक्रेते, एजंट्स,
व्यावसायिकांचा २ मार्चला मोर्चा
कोल्हापूर, ता. २५ : वृत्तपत्र विक्रेते व वृत्तपत्र व्यवसायातील सर्व घटकांकरिता कल्याणकारी मंडळ व्हावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर २ मार्चला धडक मोर्चा काढण्याचा निर्धार झाला.
कोल्हापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेची बैठक आयटक कामगार केंद्र बिंदू चौकात शिवगोंडा खोत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्ह्यातील बारा तालुक्यांतील सचिव अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्यांची उपस्थिती होती. बैठकीत रघुनाथ कांबळे यांनी राज्य संघटनेच्या बुलढाणा येथील अधिवेशनाची माहिती दिली. कल्याणकारी मंडळावर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात कल्याणकारी मंडळ व इतर समस्यांबद्दल श्री. खोत यांनी मार्गदर्शन केले. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा लढाऊ व संघर्षात अग्रेसर असल्याचे सांगितले.
बैठकीत शिवाजी मगदूम यांनी बांधकाम, मोलकरीण व इतर मंडळांची माहिती देऊन संघर्षास तयार राहा; असे सांगितले. शहर संघटनेचे रवी लाड राज्य संघटनेचे संचालक अण्णा गुंडे, हातकणंगलेचे सुनील पाटील, करवीरचे शिवाजी कुंभार, जयसिंग कांबळे यांनी मते मांडली. जिल्हाध्यक्ष किरण व्हनगुत्ते यांनी आभार मांडले.
बैठकीस सुरेश ब्राम्हपुरे, समीर कवटेकर, शिवानंद रावळ, धनंजय शिराळकर, सतीश दिवटे, जीवनधर कुंभार, आण्णासो पाटील, अंकुश परब, अॅन्थोनी बारदेस्कर, सदाशिव सोळसे, कृष्णाथ जाधव, वसंत चिले, सुरेश कापसे, सुभाष कुऱ्हाडे, ओंकार साखरे, सागर रुईकर, राजाराम पाटील, दिनकर माळी, रमेश जाधव व पदाधिकारी उपस्थित होते.
मोर्चासाठी दु. १२ वाजता टाऊन हॉलमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन वृत्तपत्र विक्रेते, एजंट्स, पायलट, वृत्तपत्र वार्ताहर, फोटोग्राफर्सना केले आहे.