ओंकार कडव, आदित्य सावळकर व अभिषेक पाटील आघाडीवर

ओंकार कडव, आदित्य सावळकर व अभिषेक पाटील आघाडीवर

लोगो- अशोक कुलकर्णी स्मृती बुद्धिबळ स्पर्धा

फोटो 85477
-
कोल्हापूर : अशोक कुलकर्णी स्मृती जलद बुद्धिबळ स्पर्धेचे बुद्धिबळाच्या पटावर चाल करून उद्‌घाटन करताना सकाळ माध्यम समूहाचे संचालक संपादक श्रीराम पवार व प्रशिक्षक जयंत गोखले. शेजारी प्रवीण शहा, ऋचा पुजारी, भरत चौगुले, विनोद डिग्रजकर, अरुण मराठे, आनंद कुलकर्णी. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

ओंकार कडव, आदित्य सावळकर, अभिषेक पाटील आघाडीवर

कोल्हापूर, ता. २६ : अशोक कुलकर्णी स्मृती तृतीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेचे उद्‌घाटन सकाळ माध्यम समूहाचे संचालक संपादक श्रीराम पवार, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू व प्रशिक्षक जयंत गोखले यांच्या हस्ते पटावर चाल करून केले. यावेळी कोल्हापूर महावितरण परिमंडळाचे मुख्य अभियंते परेश भागवत, श्री महालक्ष्मी सहकारी बँकेचे अध्यक्ष विनोद डिग्रजकर, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष प्रा. अरुण मराठे, उद्योजक प्रवीण शहा, आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, आंतरराष्ट्रीय महिला मास्टर ऋचा पुजारी, स्पर्धा संयोजक आनंद कुलकर्णी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, ‘महाविद्यालयीन जीवनात मी बुद्धिबळ खेळत असे. त्यानंतर पत्रकारितेत ‘बुद्धि’बळाचे अनेक डाव पाहिले. या स्पर्धेतून उपनगरातील बुद्धिबळ खेळाला आणि क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल.’
स्पर्धेच्या पाचव्या फेरीनंतर चौथा मानांकित सातारचा ओंकार कडव, आठवा मानांकित कोल्हापूरचा आदित्य सावळकर व तेरावा मानांकित मिरजेचा अभिषेक पाटील हे तिघे जण पाचपैकी पाच गुण मिळवून संयुक्तपणे आघाडीवर आहेत. द्वितीय मानांकित रेंदाळचा श्रीराज भोसले व १७ वी मानांकित जयसिंगपूरची दिशा पाटील हे दोघेजण साडेचार गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत. पाचवा मानांकित सातारचा अनिकेत बापट, सहावा मानांकित इचलकरंजीचा रवींद्र निकम, नववा मानांकित कागलचा निहाल मुल्ला, अकरावा मानांकित कोल्हापूरचा सोहम खासबारदार यांच्यासह हर्षल पाटील जेजुरी, आरव पाटील कोल्हापूर, योगेश महामुनी पुणे, वरद आठल्ये कोल्हापूर, नागनाथ हलकुडे पुणे, प्रणव पाटील कोल्हापूर, अथर्व चव्हाण कोल्हापूर, अभय भोसले जांभळी, शंतनू पाटील कोल्हापूर, संतोष रसाळ कोल्हापूर व अमित मुडगुंडी चिकोडी हे १५ जण चार गुणांसह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com