फुलेवाडीचा संघर्ष , शिवाजी मंडळचा विजय

फुलेवाडीचा संघर्ष , शिवाजी मंडळचा विजय

फोटो- 85475
-
लोगो- सतेज चषक फुटबॉल स्पर्धा
.......
फुलेवाडीचा संघर्ष, शिवाजी मंडळचा विजय
उपांत्य फेरीत प्रवेश; खेळाडूंमध्ये वाद, अंगावर धावून जाण्याचा प्रकार

कोल्हापूर, ता. २६ : फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळच्या खेळाडूंनी अखेरपर्यंत केलेला संघर्ष गोलमध्ये रूपांतरित न झाल्याने अखेर श्री शिवाजी तरुण मंडळ संघाने सामन्यात २ - १ गोल फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाटाकडील तालीम मंडळ आयोजित सतेज चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीला छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरुवात झाली.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच आघाडीवर असणाऱ्या फुलेवाडी संघाला सामनाअखेर हार पत्करावी लागली. श्री शिवाजी तरुण मंडळ संघाच्या दोन गोलमुळे संघाने उपांत्यफेरी गाठली. आक्रमक सुरुवात करणाऱ्या फुलेवाडी संघाने सामन्याच्या ६ व्या मिनिटाला गोल नोंदवत आघाडी घेतली. स्टॅनली याने हा गोल नोंदवत संघाच्या उपांत्य फेरी प्रवेशाचे दार ठोठावले. यानंतर सातत्याने केलेली आक्रमणे गोल न होता क्षमली.
पूर्वार्धाच्या अधिकच्या वेळेत श्री शिवाजी तरुण मंडळाच्या संकेत साळोखे याने गोल नोंदवत सामना एक गोल बरोबरीत आणला. उत्तरार्धात दोन्ही संघांना विजयाची समान संधी उपलब्ध झाल्याने अधिक आक्रमक चाली रचत गोलसाठी प्रयत्न केले. मात्र, दोन्ही संघांना यश आले नाही. सामना पुढे सरकेल तसा दोन्ही संघांची आक्रमकता वाढली. यामुळे संघातील खेळाडूंमध्ये धुसफूस वाढत राहिली. दरम्यान, श्री शिवाजी तरुण मंडळ संघाच्या रोहन आडनाईक याने ७९ व्या मिनिटाला हेडद्वारे गोल नोंदवत सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली. यानंतर फुलेवाडी संघाकडून श्री शिवाजी तरुण मंडळाच्या गोलजाळीवर आक्रमण झाले. यावेळी श्री शिवाजी तरुण मंडळाचा गोलरक्षक व फुलेवाडी संघाच्या खेळाडूंमध्ये धडक झाली. यानंतर दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये वाद होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार झाला. यानंतर मुख्य पंचांनी मैदानातील गैरवर्तनाबद्दल मंडळच्या रोहन आडनाईक याला रेड कार्ड तर विराज साळोखे याला यल्लो कार्ड दिले. विराजचे हे दुसरे यल्लो कार्ड ठरून त्याला रेड कार्ड बहाल करण्यात आले. अखेरपर्यंत हाच गोल फरक राहिल्याने मंडळ संघाने सामना जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

चौकट
आजचा सामना
खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com