टायब्रेकरवर बालगोपालचा विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टायब्रेकरवर बालगोपालचा विजय
टायब्रेकरवर बालगोपालचा विजय

टायब्रेकरवर बालगोपालचा विजय

sakal_logo
By

लोगो- सतेज चषक फुटबॉल स्पर्धा
-
फोटो- 85662

टायब्रेकरवर बालगोपालचा विजय  
कोल्हापूर, ता. २७ : रटाळवाणा ठरलेल्या सामन्यांमध्ये टायब्रेकरवर बालगोपाल तालीम मंडळ संघाने खंडोबा तालीम मंडळ संघावर ५-३ गोल फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. सतेज चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे.  
स्पर्धेतील पहिल्या टायब्रेकरमध्ये बालगोपाल संघ सरस ठरत खंडोबा संघावर विजय मिळवला. उपांत्यपूर्व सामन्यात दोन्ही संघाना पूर्ण वेळेत एकही गोल नोंदवता आला नाही. रटाळवाण्या ठरलेल्या या सामन्यांमध्ये दोन्ही संघातील खेळाडू मैदानभर फुटबॉल हाकत राहिले. एखाद दुसरा गोलसाठीचा प्रयत्नही निरर्थकच होता. अखेर पूर्णवेळ सामना गोल शून्य बरोबरीत राहून सामना टाय ब्रेकरवर खेळवण्यात आला. खंडोबा संघाच्या कुणाल दळवी याला लढवय्या खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.  

चौकट
असा झाला टाय ब्रेकर  
बालगोपाल                खंडोबा 
प्रतीक पोवार - गोल* मायकल सेफ - गोल          
ऋतुराज पाटील - गोल* श्रीधर परब - गोल 
आशिष कुरणे- गोल*अबूबकर अल  हसन - अवे
प्रसाद सरनाईक - गोल* प्रभू पोवार - गोल 
व्हिक्टर - गोल 

चौकट
आजचा सामना 
दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध  बीजीएम स्पोर्टस्