क्रीडा प्रबोधिनी यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रीडा प्रबोधिनी यश
क्रीडा प्रबोधिनी यश

क्रीडा प्रबोधिनी यश

sakal_logo
By

12236

शालेय कुस्ती स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनीचे यश
कोल्हापूर : येथील क्रीडा प्रबोधिनीतील पैलवानांनी राज्य शालेय कुस्ती स्पर्धेत तीन सुवर्ण व एक कांस्यपदक पटकाविले. जिल्हा क्रीडा परिषद व सातारा जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे स्पर्धा झाली. श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे स्पर्धेचे आयोजन केले होते.
यशस्वी असे : ओंकार कुंभार (५१ किलो, ग्रीकोरोमन - सुवर्ण), अभिषेक लिमन (५५ किलो, फ्रीस्टाइल - सुवर्ण), हर्षवर्धन खांडेकर (६५ किलो, ग्रीकोरोमन - सुवर्ण), प्रणव काळे (६० किलो, फ्रीस्टाईल - कांस्य). त्यांना क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर साखरे यांचे प्रोत्साहन, तर शासकीय कुस्ती मार्गदर्शक प्रवीण कोंडावळे व एन. आय. एस. कुस्ती प्रशिक्षक कृष्णात पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.