कचरा वेचक हक्क परिषद

कचरा वेचक हक्क परिषद

फोटो मोहन मेस्त्री
...


कचरा वेचकांना घनकचरा
व्यवस्थापनात सामावून घ्या

‘अवनि’च्या कचरा वेचक हक्क परिषदेत मागणी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ३ : महानगरपालिकेच्या खर्चात बचत करणाऱ्या सर्व कचरा वेचकांना विनाविलंब ओळखपत्रे द्यावीत, सर्व कचरा वेचक कामगारांना महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापनात प्राधान्यक्रमाने सामावून घ्यावे. त्यांना अंत्योदयची रेशन कार्ड द्यावीत, कचरा वेचक कामगारांच्या पाल्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती देणे बंधनकारक करा, या कामगारांसाठी स्वतंत्र घरकुल योजना राबवा, त्यांच्या पाल्यांसाठी मोफत निवासी शाळांची व्यवस्था करा, कचरा पेटवण्यावर कारवाई करावी, आदी मागण्या अवनि संस्था आयोजित कचरा वेचक हक्क परिषदेत करण्यात आल्या. राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये ही परिषद झाली. सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले अध्यक्षस्थानी होत्या.

प्रास्ताविक ‘अवनि’च्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी केले. कचरावेचकांचे संघटन व अवनिचा कचरा व्यवस्थापनाचा लढा, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. ‘कचरावेचक सहकारी संस्थेतून आर्थिक, सामाजिक परिस्थिती नक्कीच बदलतील,’ असा विश्वास इतिहास संशोधक उदय मोरे यांनी व्यक्त केला.

तोकले म्हणाल्या, ‘स्त्रीमध्ये खूप मोठे सामर्थ्य आहे. महिलांना या जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही. पर्यावरणाचे काम करण्याचा महत्त्वाचा उद्देश समोर घेऊन तुम्ही निर्माण केलेल्या कचरा वेचक संघटनेतून नक्कीच लाभ होणार आहे. कचरा वेचक जर संघटित राहिल्या तरच त्यांना या लढ्यात यश मिळेल.’
परिषदेत मंजुळा पिशवीकर, उपाध्यक्ष संजय पाटील, डॉ. सूरज पवार, डॉ. रजपूत, महापालिका महिला बालकल्याण अधिक्षका प्रीती घाटोळे, उज्वल नागेशकर, उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी प्रमोद माने यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कचरावेचक सहकारी संस्था अध्यक्षा भारती कोळी, वसुधा कचरावेचक संघटना जिल्हा अध्यक्षा अक्काताई गोसावी, जरीना बेपारी, कौशल्या राऊत, रेहाना बेपारी, सारिका भोरे, संगीता म्हस्के, भारती कोळी, संगीता लाखे, लक्ष्मी कांबळे आदी कचरावेचक महिला उपस्थित होत्या. कचरावेचकांनी परिषदेत त्यांच्या अधिकारासाठी ठराव वाचन केले. ‘अवनि’चे जैनुद्दीन पन्हाळकर, वनिता कांबळे, अभिजित जाधव, सविता कांबळे, अन्नपूर्णा कोगले, माया जोगदे, पूनम माळी, आर्यन कांबळे, नयन जाधव, अजय घोडगे यावेळी उपस्थित होते.
----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com