दिलबहार अंतिम फेरीत

दिलबहार अंतिम फेरीत

फोटो- 86697
---
लोगो- सतेज चषक फुटबॉल स्पर्धा


दिलबहार अंतिम फेरीत दाखल 
‘बालगोपाल’शी भिडणार; दुसऱ्या उपांत्य सामन्यात ‘प्रॅक्टिस’वर मात  

कोल्हापूर, ता. ३ : दुसऱ्या उपांत्य सामन्यात प्रॅक्टिस  फुटबॉल क्लबला नमवत दिलबहार तालीम संघाने अंतिम फेरीत धडक मारली. पाटाकडील तालीम मंडळ आयोजित सतेज चषक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य सामना छत्रपती शाहू स्टेडियमवर झाला.  दिलबहारचा आक्रमक खेळ विरुद्ध प्रॅक्टिस संघाच्या संथ व योजनाशून्य खेळामुळे दिलबहार संघाने २ - ० गोल फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक चाली रचणाऱ्या दिलबहार संघाचे सामन्यावर वर्चस्व राहिले. या उलट प्रॅक्टिस संघाकडून सुरुवातीपासूनच बचावात्मक खेळ झाला. बचावात्मक खेळामुळे दिलबहार संघाला गोल पूर्वार्धात गोल नोंदवणे शक्य झाले नाही. या उलट प्रॅक्टिस संघही गोल न नोंदवता गोल शून्य बरोबरीतच राहिला. उत्तरार्धात अधिक आक्रमक खेळ करणाऱ्या दिलबहार संघाने ताबडतोड आक्रमक चाली रचत संधी निर्माण केल्या. यात मोहम्मद खुर्शीद याने ४३ व्या मिनिटाला गोल नोंदवत सामन्यात संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर दिलबहार संघ अधिक आक्रमक खेळ करत राहिला तर प्रॅक्टिस संघाने मध्यफळी व बचावफळी अधिक बळकट करण्यावर भर दिला. मात्र, थोड्याच वेळात सामन्याच्या ६४ व्या मिनिटाला मोहम्मद खुर्शीद याने वैयक्तिक व संघासाठी दुसऱ्या गोलची नोंद करत सामन्यात २-० अशी भक्कम आघाडी घेतली. या गोलनंतर प्रॅक्टिस संघाने आक्रमक पावित्रा घेतला. मात्र खेळाडूंमध्ये समन्वयाची कमतरता दिसली. मिळालेल्या संधी गोलजाळी वरून फटके मारत दवडली. अखेर सामन्यात दिलबहार विजयी ठरला. लढवय्या खेळाडू म्हणून प्रॅक्टिसच्या आदित्य पाटीलला गौरवण्यात आले.  

चौकट 
हुल्लडबाजी कमी होणार कधी?
मैदानावर प्रेक्षकांची हुल्लडबाजी कमी होण्याचे चिन्ह नाहीत. मस्तीखोर प्रेक्षकांनी प्रेक्षक गॅलरीतून रॉकेट उडवल्याने महिला बैठक व्यवस्थेवरील कापडी मंडपाने आग पकडली. रॉकेट फुटून मंडपावरून धूर येऊ लागल्याने घबराहट निर्माण झाली. येथे सामना पाहण्यासाठी आलेल्या महिलेने प्रसंगावधान राखत पाण्याच्या बाटलीने पाणी मारल्याने पुढील अनर्थ टळला. येथे सामना पाहण्यासाठी महिलांसह केएसए येथे प्रशिक्षणासाठी येणाऱ्या लहान मुलांची रेलचेल येथे असते.

चौकट 
पंचानी सामना थांबवला 
अचानक घडलेल्या प्रसंगामुळे मैदानावर गोंधळ उडाला. यामुळे सामना पंचानी सामना थांबवत परिस्थिती नियंत्रणात येण्याची वाट पाहिली. पोलिसांनी हुल्लडबाज प्रेक्षकांच्या शोधासाठी धाव घेतली. मात्र गर्दीचा फायदा घेत त्यांनी पळ काढला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com