Tue, June 6, 2023

पानसरे खटला 13 मार्च
पानसरे खटला 13 मार्च
Published on : 7 March 2023, 6:56 am
पानसरे खटल्याची सुनावणी १३ मार्चला
कोल्हापूर : संशयित आरोपींचे वकील गैरहजर राहणार असल्याने मंगळवारची पानसरे खटल्याची सुनावणी १३ मार्चला ठेवण्यात आली आहे. तिसरे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्या न्यायालयासमोर सुनावणी सुरू आहे. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे खून खटल्याप्रकरणी मंगळवारी न्यायालयात चौघा साक्षीदारांच्या साक्षी तपासल्या जाणार होत्या. यामध्ये भाकपचे पदाधिकारी सतीशचंद्र कांबळे, इम्तियाज हकीम यांच्यासह मुंबई येथील सुरेश घाडीगावकर, विजयकुमार नार्वेकर यांचा समावेश होता. त्यांना साक्षी तपासण्यासाठी न्यायालयाने समन्स बजावून न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे, मेघा पानसरे कॉ. दिलीप पवार सुद्धा न्यायालयात उपस्थित होते. पुढील सुनावणी १३ मार्चला होणार आहे.