मराठा महासंघ बैठक

मराठा महासंघ बैठक

12277

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे पाडवा महामेळावा नियोजनासाठी आयोजित बैठकीत बोलताना वसंतराव मुळीक.
...

मराठा समाजाचा २३ मार्चला पाडवा महामेळावा

वसंतराव मुळीकः २५ हजार मराठा बांधवांच्या राहणार उपस्थिती

कोल्हापूर, ता. ७ : ‘दसरा चौकात २३ मार्चला २५ हजार मराठा बांधवांच्या उपस्थितीत पाडवा महामेळावा होण्यासाठी प्रयत्नशील आहे’, असे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी आज येथे सांगितले. जिल्ह्यात जनजागृतीसाठी गावोगावी संपर्क व १०० सभांचे नियोजन केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे पाडवा महामेळावा नियोजनासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. ज्येष्ठ कार्यकर्ते संभाजीराव जगदाळे अध्यक्षस्थानी होते. मंगळवार पेठेतील बजापराव माने तालीम येथे बैठक झाली.
श्री. मुळीक म्हणाले, ‘भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या क्रांतीकारकांसह मराठा समाजासाठी पहिले बलिदान देणारे (कै.) अण्णासाहेब पाटील यांना २३ मार्चला अभिवादन करून मेळाव्याला सुरुवात होणार आहे. शासनदरबारी मराठा समाजाचा दबाव गट निर्माण करण्यासाठी प्रत्येक वर्षी पाडव्याच्या मुहूर्तावर पाडवा महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे नक्कीच समाज जागृत होईल. मेळाव्यात समाजातील प्रत्येक अडचणींवर चर्चा करण्यात येणार असून, शासन दरबारी असणाऱ्या अनेक अडचणी मेळाव्याच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. समाज एकसंघ होणे, ही काळाची गरज आहे.’

जगदाळे म्हणाले, "राजकीय नेते समाजाचा फक्त वापर करतात. समाजाला योग्य दिशा द्यायची असेल तर समाजाने स्वतः मेळाव्याला येणे गरजेचे आहे. कोणी आमंत्रण देवो वा न देवो आपल्या भावी पिढीच्या भवितव्यासाठी या मेळाव्याला उपस्थित राहूया."
यावेळी शैलजा भोसले, नीलम मोरे, अंजली जाधव, विजय पाटील, सुशांत पाटील, विश्वासराव चौगुले, उदय देसाई, शिवाजी मोरे, दीपक पाटील, दत्ता पाटील रंगराव चौगुले यांनी मनोगत केले.
याप्रसंगी शशिकांत पाटील, विश्वाराव चौगुले, चंद्रकांत चव्हाण, उत्तम जाधव, विजय काकोडकर, शंकरराव शेळके, सी. एम.गायकवाड, प्रकाश पाटील, सरदार पाटील, बाबासाहेब पोवार-लबेकर , श्रीकांत मनोळे, शैलजा भोसले, दीपा डोणे, संयोगीता देसाई, इंद्रजित माने आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com