बॉक्सिंग बिग स्टोरी

बॉक्सिंग बिग स्टोरी

12293, 12294
कोल्हापूर : बॉक्सिंग स्पर्धेतील क्षण (संग्रहित)
------------

बिग स्टोरी
सुयोग घाटगे

बॉक्सिंगमधला
कोल्हापुरी ‘पंच’

भारतीय संघात लक्षणीय सहभाग; विद्यार्थ्यांचाही वाढता ओघ

भारतीय मुष्टियुद्ध संघातील १० पैकी ६ मुली कोल्हापूरच्या असायच्या. १९९६ च्या दरम्यानची ही आठवण जिल्ह्यातील मुष्टियुद्ध (बॉक्सिंग) सोबत जोडलेले अनेकजण आजही सांगतात. याचाच अर्थ भारतीय संघाच्या ‘पंच’ला खरी ‘पॉवर’ कोल्हापूरनेच दिली. हाच वारसा आजही कायम असून १ हजारहून अधिक खेळाडू रिंगमध्ये घाम गाळत आहेत.
--------------

शाळांचा वाढता सहभाग
मधल्या काळामध्ये बॉक्सिंगकडे कल कमी होता. मात्र सातत्याच्या प्रयत्नामुळे पुन्हा ओघ वाढला आहे. बॉक्सिंग प्रशिक्षण असणाऱ्या शाळांमध्येच विद्यार्थी संख्या वाढत आहे. यामध्ये इंटरनॅशनल स्कूल आघाडीवर आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत शालेय बॉक्सिंग स्पर्धा ही एक दिवसामध्ये पूर्ण होत असे. मात्र सध्या स्पर्धा ५ दिवस चालतात. १ हजारहून अधिक नवोदित खेळाडू पुढे येत आहेत.

नोकरीची संधी
संरक्षण दल व रेल्वेमध्ये बॉक्सिंग खेळाडूंसाठी थेट भरतीची सोय असल्यामुळे हा खेळ हमखास नोकरी मिळवून देणारा आहे. कोल्हापूरमधील ४० हून अधिक खेळाडू उच्च पदावर नोकरीवर आहेत.

‘नॅशनल’मध्ये डंका
सध्या कोल्हापूरची दहाहून अधिक मुले पुरुष संघात तर ११ हून अधिक मुली महिला बॉक्सिंग संघात आहेत. येत्या काळात किमान २० मुले व मुली भारतीय संघात स्थान निश्चित करण्याच्या तयारीत आहेत.

शहरात दोनच रिंग
बॉक्सिंगचा विस्तार होत असताना फक्त दोनच ठिकाणी बॉक्सिंग प्रशिक्षणाची सोय आहे. महापालिकेचे टाकाळा येथील व राजोपाध्येनगर येथील हॉलमध्ये बॉक्सिंग प्रशिक्षण व स्पर्धा होतात. दिवसाचे भाडे जास्त असल्याने सामान्यांच्या मुलांना हे शक्य होत नाही. मनपाने क्रीडा विकासाच्या दृष्टीने हे शुल्क कपात केल्यास हा टक्का आणखी वाढण्यास मदत होईल.

जिल्हा परिषदेचा पुढाकार आवश्यक
सैनिक टाकळी सर्वाधिक बॉक्सिंगप्रेमींचे गाव आहे. या ठिकाणी बॉक्सिंग रिंगची मागणी अनेक वर्षांपासून आहे. जिल्हा परिषदेच्या विकास निधीतून हॉल उपलब्ध झाल्यास बॉक्सिंगच्या गावाला चालना मिळू शकते.

बावडा पॅव्हेलियन रोल मॉडेल
बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून बावडा पॅव्हेलियन येथे सुसज्ज अद्ययावत बॉक्सिंग रिंग निर्माण केली जात आहे. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा असतील.

जिल्ह्यातील ‘बॉक्सर’ची खाण
शिरोळ, राजापूरवाडी, खिद्रापूर, राजापूर, सैनिक टाकळी, टाकळीवाडी, दानवाड, दत्तवाड, घोसरवाड, लाटवाडी, अब्दुललाट, शिरढोण, गणेशवाडी, कुरुंदवाड, मजलेवाडी, इचलकरंजी, उचगाव, रेंदाळ, हुपरी, नृसिंहवाडी या गावांमध्ये बॉक्सिंग सर्वाधिक खेळले जाते.
------------------------------------

कोट
बॉक्सिंग विकासासाठी २५ वर्षांहून अधिक काळ प्रयत्न करत आहे. यात आमदार सतेज पाटील यांनी अजिंक्यतारा येथे बेसमेंटमध्ये पहिल्यांदा सुविधा उपलब्ध करून दिली. येथूनच जिल्ह्यात बॉक्सिंगच्या विकासाला सुरुवात झाली.
- मंगेश कराळे, सचिव, जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन


मुंबईबाहेर महाराष्ट्राच्या बॉक्सिंगची सुरुवात कोल्हापुरातून झाली. मात्र मधल्या काळामध्ये मरगळ आली होती. योग्य नियोजन व संयोजनामुळे बॉक्सिंग वाढणे शक्य होईल. ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये देशासाठी पदक जिंकण्याची ताकद येथील खेळाडूंमध्ये आहे. यासाठी अधिक प्रयत्न व्हावेत.
- जय कवळी, पदाधिकारी, जागतिक बॉक्सिंग संघटना

बॉक्सिंगमध्ये कोल्हापूरच्या महिला संघाचा दबदबा होता. मात्र पाठबळाचा अभाव व शासकीय अनास्थेच्या परिणामामुळे ही संख्या रोडावत गेली. सध्या हे चित्र पुन्हा पालटत असून शासकीय पाठबळ मिळणे आवश्यक आहे.
- भरत वावळ, उपाध्यक्ष, महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com