बाजार समिती चौकशीचे आदेश

बाजार समिती चौकशीचे आदेश

बाजार समिती बोगस मतदारांची
चौकशी करण्याचे आदेश

कोल्हापूर, ता.9 : जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदार यादीत काही बोगस मतदारांची नावे असल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा सहकार निबंधक नीलकंठ करे यांनी दिले. या चौकशीसाठी सहाय्यक निबंध सुजय येजरे यांची एक सदस्य चौकशी समिती म्हणून नियुक्ती केली आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदार यादीमध्ये 319 मतदारांची नावे घुसडली आहेत. तसेच त्यासाठी बोगस कागदपत्रे तयार केली आहेत, अशा आशयाच्या तक्रारी जिल्हा निबंधकांकडे आल्या होत्या. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडेही काही व्यापारी प्रतिनिधींनी मतदार यादीत तांत्रिक घोळ झाल्याची कैफियत मांडली होती. त्याची दखल घेत सहकार निबंधकांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी व अहवाल सादर करावा, असे आदेश चौकशी समितीला दिले आहेत. शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊन सहा महिने होत आले असून, निवडणूक पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
............
वाटेगावला अण्णाभाऊ साठे यांचे नवीन स्मारक
कोल्हापूर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सांगली जिल्ह्यातील वाटेगाव (ता. वाळवा) येथे आण्णाभाऊ साठेंचे नवीन स्मारक बांधण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीला यश मिळाले असून, सामाजिक न्याय विभागाच्या संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विविध विषयांच्या अनुषंगाने आज बैठक झाल्याचेही त्यांनी सांगितले.
......
माणगाववाडीत तीन लाखाची दारू जप्त
कोल्हापूर : माणगाववाडी (ता. हातकणंगले) येथील दारूच्या अड्ड्यावर आज राज्य उत्पादन शुल्क व हातकणंगले पोलिसांनी छापे टाकले. यावेळी एकूण तीन लाख सहा हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक रवींद्र आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. त्यामध्ये एकूण सहा गुन्हे नोंदवण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com