
डॉ. मोरे यांना जीवन गौरव पुरस्कार
12309
आकुर्डी (पुणे)ः ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे यांना ''मराठा समाजरत्न जीवनगौरव'' पुरस्काराने गौरवताना खासदार ज्ञानेश्वर पाटील-गुंजाळ.
...
डॉ. वसंतराव मोरे यांना पुरस्कार प्रदान
कोल्हापूर : आकुर्डी (पुणे) येथील आप्तेष्ट मराठा मंडळातर्फे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे यांना ''मराठा समाजरत्न जीवनगौरव'' पुरस्काराने गौरवण्यात आले. मंडळाच्या वार्षिक स्नेहमेळाव्यात पुरस्काराचे वितरण झाले. डॉ. मोरे यांनी पानिपत युद्धात शौर्य गाजविलेल्या व तेथील परिसरात वास्तव्यास राहिलेल्या रोड मराठा समाजावर संशोधन केले. त्यांची मूळ ओळख त्यांना मिळवून दिली. ‘हिंदी शिवचरित्रकार’ म्हणून त्यांची ओळख आहे. त्याची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मध्य प्रदेशातील खांडव्याचे खासदार ज्ञानेश्वर पाटील- गुंजाळ यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. या वेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थी, युवक, उद्योजक व सामाजिक व्यक्तींना डॉ. मोरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या प्रसंगी सूरत महानगरपालिकेचे नगरसेवक सोमनाथ मराठे, व्यंकटेश बेंद्रे, इतिहासकार जिजाबराव पवार, आप्तेष्ट मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर पडोळ, संजय जाधव, धनंजय राऊत, डॉ. संग्राम मोरे, गणेश पवार, मिलिंद पाटील उपस्थित होते.